अबब… अडीच किलोचा नाश्ता, तो ही मिरचीचा

सकाळी उठल्यानंतर नाश्ता हा सर्वसामान्यांच्या दैनंदिन, जीवनातील अविभाज्य घटक आहे. परंतु, कुणी अडीच किलोचा नाश्ता करतो आणि तो ही मिरचीचा, असे सांगितल्यास सर्वजण समोरच्याला वेड्यात काढतील. शिवाय मिरची म्हंटले की, आधीच अनेकांच्या डोळ्यातून पाणी यायला लागते. परंतु, चीनमधील हा इसम दोन चार नव्हे, तर चक्क अडीच किलो लाल मिरचीचा नाश्ता करतो आणि तोहा sss … देखील करत नाही. म्हणूनच तो चिली किंग नावाने ओळखला जातो. ली योंगझी, असे या चिली किंगचे नाव असून, तो झेंगझोऊ अर्थातच हेनन प्रांतातील रहिवासी आहे. विशेष म्हणजे योंगझी गेल्या दहावर्षांपासून कोणत्याही त्रासाविना लाल मिरची खात आहे. एवढंच नव्हे तर वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता, तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ली दिवसभरात अडीच किलो मिरची अगदी आरामात खातो. मी अंड कींवा मांसाहाराशिवाय राहू शकतो. परंतु ,मिरची विना एकही दिवस जिवंत राहू शकत नाही. असे योंग झी सांगतो. ली च्या इतर सवयी देखील अनोख्याच आहेत. साधारणपणे लोक सकाळी उठल्यानंतर पेस्ट कींवा मंजनाने ब्रश करतात. परंतु, ली मिरची खाऊन गुळणा करतो. मिरचीविना तयार होणाऱ्या जेवणात काहीच स्वाद नसतो, असे सांगतानाच ली म्हणतो की, हा काही ईश्वरीय चमत्कार नसून, मिरची खाणे मला आवडते आणि मी ती आनंदाने खातो !.