शुक्राणू दान करण्याऱ्यात भारतीय अधिक

काही दिवसांपूर्वी चीनमध्ये शुक्राणूंचे दान करणाऱ्यांची गर्दी होत असल्याची बातमी असतानाच ब्रिटनमधील अशीच एक बातमी समोर आली आहे. इथे चिनी लोक नाहीतर शुक्राणू दान करण्यासाठी सर्वात जास्त भारतीय येत असल्याचे समोर आले आहे. शुक्राणू दान करणाऱ्या वेगवेगळया समूहांच्या लोकांमध्ये भारतीय लोकांची संख्या अधिक असल्याचेही निदर्शनास आले आहे.
न्यूयार्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटनच्या ह्यूमन फर्टिलायझेशन अँड अँईम्ब्रीऑलॉजी अथॉरिटी या संस्थेच्या आकडेवारीनुसार अनेक भारतीयांनी शुक्राणु दान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी त्यांच्या नावाची नोंदणीही केली होती.
ब्रिटनमंध्ये राहणाऱ्या वेगवेगळ्या समूहांच्या संख्येच्या तुलनेत ही संख्या अधिक असल्याचे सांगण्यात येते. शुक्राणू दान करणाऱ्यांच्या या यादीमध्ये पाकिस्थानी १३, आयरलॅंडचे ३४, चीनमधील १७ आणि २६ आफ्रिकेतील लोकं आहेत. या यादीत एकही बांग्लादेशी नाही.
एक शुक्राणू दाता हा १० अपत्य नसलेल्या परिवारांना मदत करण्याची क्षमता ठेवतो. ताज्या आकडेवारीनुसार ब्रिटनच्या प्रत्येकी सातपैकी एका दाम्पत्याला मूळ जन्माला घालण्यात अडचणी आहेत. त्यामुळे शुक्राणू दात्यांना मागणी वाढली आहे.