छायाचित्र बघून पटविता येते महिलेची ओळख!

पुरूष असा आहे, हे फक्त स्त्रीलाच ओळखता येते. असे आतापर्यंत मानले जायचे. परंतु कोणाची स्त्री धोकेबाज आहे आणि कोणती नाही. हे पुरुष देखील छायाचित्र बघून ओळखू शकतात, असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी हा आगळा वेगळा शोध लावला आहे. समोरची स्त्री आपल्याशी विवाह करेल की हृदय तोडेल याचा अंदाज पुरुष संबंधित महिलेचे छायाचित्र बघून लावू शकतो, असा दावा या वैज्ञानिकांनी संशोधनाअंती केला आहे. या संशोधनात सहभागी करून घेण्यात आलेल्या पुरुषांना अशा १७ महिलांच्या जोड्यांवर नजर टाकण्यास सांगण्यात आले. जी एकनिष्ठ आणि धोका देणाऱ्या महिलांची होती. यापैकी काही महिला आपल्या साथीदाराप्रती एकनिष्ठ होत्या. तर काहींचे विवाहबाह्य संबंध होते, अशी माहिती या संशोधनात सहभागी असलेल्या डॉक्टर सामंता लीव्हर्स यांनी दिली.
डॉ.सामंता यांच्यानुसार कोणती महिला साथ देणार आणि कोणती दुखावणार यांचा अचूक अंदाज लावण्यात ५५ ते ५९ पुरुष यशस्वी ठरले. जेव्हा पुरुष एखाद्या महिलेचा चेहरा बघेल तेव्हा त्याला १०० टक्के सत्य कळेल, अशी अपेक्षा आम्ही मुळीच केली नव्हती. परंतु याप्रमाणे सत्याचा जराही अंदाज लावता आला, तर तो एक चांगला विचार आहे, असेही डॉ.सामंता म्हणाल्या. आम्हीदेखील कमी नाही आणि कुणाकडूनही फसवणूक होऊ देणार नाही, असं पुरुषही डॉक्टर लीव्हर्स यांच्या संशोधनानंतर ताम्रपणे सांगू शकतील.