तिहार तुरुंगात दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांची ईडी कडून चौकशी

नवी दिल्ली – (पीटीआय) अबकारी धोरणातील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी दिल्लीचे मंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते सत्येंद्र जैन यांची तिहार तुरुंगात चौकशी केली. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली.

आता हे उत्पादन शुल्क धोरण मागे घेण्यात आले आहे. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदीनुसार एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी जैन यांचे जबाब नोंदवले. ईडीने चौकशीच्या परवानगीसाठी स्थानिक न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने तपास यंत्रणेला 16, 22 आणि 23 सप्टेंबर रोजी चौकशी करण्याची परवानगी दिली.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *