
लंडन (पीटीआय) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शासकीय अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी लंडन येथे तीन दिवसीय दौऱ्यावर असताना रविवारी भारत सरकारच्या वतीने शोकपुस्तिकेवर स्वाक्षरी केली. लंडनमधील लँकेस्टर हाऊसमध्ये राष्ट्रपती मुर्मू यांच्यासोबत कार्यवाहक उच्चायुक्त सुजित घोषही उपस्थित होते. येथे येणारे जागतिक नेते राणी एलिझाबेथ च्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी एका पत्रिकेवर स्वाक्षरी करत आहेत.