सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • अर्थकारण/
  • शेवगा पिकांमध्ये संजीवकांचा वापर, रोग व कीडनियंत्रण आवश्यक

शेवगा पिकांमध्ये संजीवकांचा वापर, रोग व कीडनियंत्रण आवश्यक

by सह्याद्री मराठी वृत्त 15 November 2022 0 Comments
15Nov, 2022

शेवगा पिकांमध्ये उत्तम शेंगा उत्पादनासाठी संजीवकांचा वापर आणि वेळेवर रोग व कीडनियंत्रण याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

पीक संजीवकाची फवारणी
पीक फुलोऱ्यात असताना फूलगळ टाळण्यासाठी व भरपूर शेंगा लागण्यासाठी नॅप्थील ॲसेटिक ॲसिड (एन.ए.ए.) ४ मि.लि. प्रति १० लिटर (१० पीपीएम ) याप्रमाणे फवारावे.

पीक संरक्षण


१) पाने खाणारी अळी :
शास्त्रीय नाव – स्पोडोप्टेरा लिट्यूरा
सुरवातीस कोवळ्या पानांवर प्रादुर्भावास सुरवात होते. हळूहळू ८ ते १० दिवसांत संपूर्ण पाने, कोवळे शेंडे व झाडाची कोवळी साल खाऊन टाकते ही अळी खादाड असल्याने थोड्याच दिवसात संपूर्ण झाडाचे नुकसान करते. पानाच्या शिरावरील हरित द्रव्य खाते व पानाची जाळी तयार होते.


नियंत्रण :
फवारणी प्रति लिटर पाणी
क्लोरपायरीफॉस (५०%) अधिक सायपरमेथ्रीन (५%) संयुक्त कीटकनाशक १ ते १.५ मिलि
किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन १ ते १.५ मिली किंवा मोनोक्रोटोफॉस १ ते १.५ मिली

२) फळमाशी :
शास्त्रीय नाव – Gitona distiema
ही माशी कोवळ्या व तयार शेंगावर अंडी सोडते. ३ ते ४ दिवसांत अंड्यातून अळ्या बाहेर येतात. त्या शेंगात शिरून आतील गर खातात. शेंगातून डिंक व फेस बाहेर पडतो, शेंगा वाळून जातात व सडतात. याला अनेक शेतकरी डिंक्या म्हणून ओळखतात.


नियंत्रण : फवारणी प्रति लिटर पाणी
स्पिनोसॅड (४५ एससी) ०.३ ते ०.४ मिली.

रोग

१) करपा :
पानावर काळपट ठिपके येतात. फांद्या करपतात. पाने पिवळी पडून गळतात. करपा रोगामुळे झाडे पिवळे पडून करपल्यासारखे दिसते.


नियंत्रण :
फवारणी प्रति लिटर पाणी
कार्बेन्डाझीम १ ग्रॅम किंवा
मॅन्कोझेब १ ग्रॅम

२) मररोग ( मुळकुज )
पाण्याचा निचरा न होणारी जमीन, पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहणे यामुळे झाडांच्या मुळा पाण्यात राहिल्यामुळे सुरवातीला झाडे पिवळे पडतात व नंतर ४ ते ५ दिवसांनी झाड वरून पूर्ण वाळत जाते व पिवळे पडून मरतात. याला आपण मररोग किंवा मुळकुज म्हणतो. उताराची व उत्तम निचरा होणाऱ्या जमिनात मररोग होत नाही.


उपाय योजना –  आळवणी (ड्रेंचिंग) प्रति लिटर पाणी
कार्बेन्डाझीम किंवा कॉपर ऑंक्सिक्लोराईड १ ते १.५ ग्रॅम.

काढणी व उत्पादन
शेवग्याच्या शेंगा जातीनुसार लागवडीनंतर ५ ते ६ महिन्यांत तोडायला येतात व पुढे ३ ते ४ महिने तोडणी चालते. शेंगा मांसल व मध्यम अवस्थेत तोडाव्यात.

सौजन्य : पवन कृषी केंद्र, बाझार वॉर्ड, भद्रावती

Next
शेपूची भाजी
November 27, 2022
Previous
शासकीय अनुदानाची व्‍यवसायांना मदत - मात्र, फिजिबिलिटी रिपोर्ट हवा
November 15, 2022
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to शेवगा पिकांमध्ये संजीवकांचा वापर, रोग व कीडनियंत्रण आवश्यक?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !