
साहित्य : १ शेपूची जुडी, ४-५ हिरव्या मिरच्या, ७-८ लसूण पाकळ्या, १ मोठा कांदा चिरलेला, भिजलेली
मुगाची डाळ, चवीनुसार मीठ, १ चमचा तेल.
कृती : शेपू स्वच्छ धुऊन कापावी. एका भांड्यात तेल गरम करायला ठेवून त्यात लसूण चेचून टाका.लसणाला तपकिरी रंग आला कि मग त्यात हिरव्या मिरच्या कापून टाका. मिरच्या चांगल्या भाजल्या कि मग त्यात चिरलेला कांदा व भिजलेली मुगाची डाळ टाकून चांगले हलवून झाकण ठेवा. ३ मिनिटांनी झाकण काढा. कांदा चांगला तपकिरी झाला कि त्यात मीठ व कापलेली शेपू टाकून चांगली हलवून २ मिनिटे झाकून ठेवा. ज्वारी बाजरीच्या भाकरी बरोबर वाढा…. फारचं उत्तम लागते.
टीप : लसूण तेलात टाकताना तेल जास्त गरम करू नये. त्याने लसूण करपतो व भाजीला करपलेला वास येतो.
त्यामुळे तेल मध्यमच गरम करावे.
पालेभाजी जास्त शिजवल्यास भाजीची चव जाते.
आवडत असल्यास शेवटी भाजीत शेंगदाण्याचे कूट टाकावे. छान लागते.
गडद हिरवी मिरची खूप तिखट असते परंतु तिला चव छान असते. तुम्ही जर जास्त तिखट
खात नसाल तर नेहमी ४ साध्या मिरच्या ऐवजी २ गडद हिरव्या मिरच्या वापरा.