
बेरोजगारीच्या समस्येने कोरोना काळानंतर अधिक उग्र रूप धारण केलं. यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे देशात स्वंय रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी पावलं उचलली आहेत. पीएम मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार स्वंय रोजगार सुरू करणाऱ्या लोकांना देत असलेले तीन प्रकारचे कर्ज व्यवसायाच्या सुरुवातीपासून व्यवसायाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर दिले जाते. त्यामुळे भावी उद्योजक आता ५० हजारांपासून ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज मिळवू शकतात. ह्या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत १ लाख २३ हजार ४२५.४० कोटी रुपयांचे कर्ज वर्ष २०२१-२२मध्ये दिले गेले आहे. तर या योजनेसाठी सरकारने एकूण तीन लाख कोटींचा निधी मंजूर केला आहे.
तुम्हाला नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल किंवा तुमच्या सुरु असलेल्या व्यवसायाला नवीन रूप द्यायचं असेल, काही नवीन उपकरणं हवी असतील, काही सेवा सुरु करायच्या असतील तर तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेऊ शकता. केंद्र सरकारने २०१८ च्या अर्थसंकल्पात लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेत तीन लाख कोटींचा निधी मंजूर केला आहे.
मोदी सरकारने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक वर्षी एक कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्येक वर्षी सुशिक्षीत बेकारांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यासाठी केंद्र सरकारने ह्या कर्जाची तरतूद केली आहे.
व्यवसाय उभारणीतून अनेक नोकऱ्या निर्माण होतात. तरुणांच्या उपजीविकेचा मार्ग मोकळा होऊ शकतात. त्यामुळे आत्मनिर्भर भारत या अभियानाला चालना मिळू शकते. प्रधानमंत्री मुद्रा योजना ही यासाठ उत्तम मध्यम आहे.
खालील क्षेत्रातील इच्छुक हे कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात –
- लघु उद्योग सुरु करणारे
- छोटी असेम्बलिंग यूनिट
- मशीन ऑपरेटर
- फळे -भाजी विक्रेते
- सर्विस सेक्टर यूनिट,
- ट्रक ऑपरेटर, रिपेयर शॉप
- कोणतीही खासगी कंपनी
- स्वामित्व आधारित प्रतिष्ठान
- फ़ूड सर्विसिंग आणि फ़ूड प्रोसेसिंग यूनिट आदि व्यवसायांना योजनेचा लाभ मिळू शकतो.
मुद्रा योजनेचे फायदे काय आहेत –
- मुद्रा योजनेते सामान्यपणे विना गॅरंटीचे कर्ज मंजूर मिळते.
- या योजनेच्या लाभार्थ्याला कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फी द्यावी लागत नाही. .
- मुद्रा योजनेतील कर्जावर व्याज दरात सूट (Interest rate discount)
केंद्र सरकारने मुद्रा लोनच्या माध्यमातून ५० हजारापर्यंत कर्ज घेतलेल्या लाभार्थींना (beneficiaries) व्याज दरात दोन टक्के सूट जाहीर केली आहे. शिशु योजनेच्या अंतर्गत ९ कोटी ३५ लाख लोकांना याचा फायदा मिळाला आहे. मुद्रा लोनमध्ये शिशु लोनशिवाय दोन अन्य कॅटेगरी आहेत. त्यामध्ये किशोर लोन आणि तरुण लोन. हे कर्ज तुम्ही ज्या व्यवसायासाठी घेणार आहात त्याचे स्वरूप आणि त्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन तुमची संबंधित बँक तुम्हाला ह्या कर्जावर व्याज आकारेल. त्यामुळे या योजनेत सगळीकडे सरसकट एकच व्याज असणार नाही. कर्ज घेताना आपण याची शहानिशा जरूर करावी.