सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • व्‍यवसाय/
  • धरावी  शेतीपूरक व्यवसायांची कास  !

धरावी  शेतीपूरक व्यवसायांची कास  !

by सह्याद्री मराठी वृत्त 14 February 2023 0 Comments
14Feb, 2023

आर्थिक नफा प्राप्त करण्यासाठी वस्तू व सेवांची केली जाणारी देवाणघेवाण म्हणजेच व्यवसाय होय. जास्तीत जास्त आर्थिक नफा मिळविणे व नफा प्राप्त करण्याबरोबरच मानवी गरजा पूर्ण करणे हादेखील एक व्यवसायाचा उद्देश आहे. व्यवसाय ही एक अखंडरित्या चालणारी प्रक्रिया आहे, असे आपण म्हणू शकतो.

व्यवसाय हा एक प्रकारे आर्थिक उपक्रम आहे, जेथे नियमित स्वरूपात वस्तू आणि सेवांचे उत्पादन होतच असते. भारत देश कृषिप्रधान आहे. कोरोनाच्या काळात या शेतीने माणसांना आधार दिला. त्यामुळे शेतीमध्ये आधुनिकता येऊन शेतीपूरक व्यवसाय वाढले पाहिजेत; ज्यामुळे शेतकऱ्यांनाही आर्थिक लाभ होईल.

दुग्धव्यवसाय

शेतकरी गाई व म्हशींचे पालन करून जवळपासच्या शहरात  दूध विकू शकतात. ते आपल्या शेतामध्ये चारा लागवड करून त्याचा उपयोग गुरांच्या खाद्यासाठी करू शकतात.

शेळीपालन व्यवसाय

शेळीपालन हा व्यवसाय सुरु करण्यासाठी सुरुवातीला कमी गुंतवणुक आहे. शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय आहे. शेतकरी कमी पैशात व कमी जागेत हा व्यवसाय अगदी सहजपणे करू शकतो, शेळीला चारा-पाणी कमी लागतो.

कुक्कुटपालन

अंडी उत्पादन आणि मांस विक्रीसाठी कुक्कुटपालन हा व्यवसाय चांगला आहे. या मांसाला  मागणी चांगली असून किंमतसुद्धा  मिळते. कुक्कुटपालन या व्यवसायासाठी कमी गुंतवणूक लागते.

अंडी उत्पादन

कोंबडी पालन करून तिची अंडीही शेतकरी  विकू शकतो. अंड्यांना बाजारपेठेत वाढती मागणी आहे.

रेशीम उद्योग व्यवसाय

शेतकरी रेशीम उद्योग सुरु करू शकतात. रेशीमकिडे झाडावर वाढतात. यापासून उत्तम उत्पन्न मिळते. त्यासाठी हा चांगला पर्याय आहे.  

 शेणखत निर्मिती व्यवसाय

ज्या शेतकऱ्यांकडे पशुधन आहे ते शेणखत निर्मिती व्यवसाय करू शकतात. कोणत्याही गुंतवणुकीविना हे खत तयार करता येते. या खताला मागणीसुद्धा भरपूर आहे.  

मशरूम उत्पादन व्यवसाय

शहरी भागात मशरूमला चांगली मागणी असून शेतकरी घरच्या घरी मशरूम तयार करून विकू शकतो. मशरूमसाठी लागणारी ‘धसकटे’ शेतातील पीककापणीनंतर मिळतात.

गुलाबापासून गुलकंद निर्मिती व्यवसाय

सध्या बाजारात गुलकंदला चांगली मागणी आहे. त्यामानाने त्याचे उत्पादन खूप कमी आहे. गुलकंदचा वापर सरबत, खाऊची पाने, दूध तसेच अन्य बऱ्याच ठिकाणी होतो.

काजूप्रक्रिया व्यवसाय

काजूवर प्रक्रिया करून त्याची विक्री करता येते.काजूप्रक्रिया व्यवसाय हा सुद्धा पैसे मिळवून देणारा व्यवसाय आहे.

अर्थात, यातील कोणताही व्यवसाय करायचा झाल्यास त्याबाबतचा अभ्यास, निरीक्षण करणे फार महत्वाचे आहे. तसेच अलीकडे बरीच प्रशिक्षणे होतात त्यांचा लाभही घ्यायला हवा.

Next
   मृत्तिका उद्योगाच्या दिशेने !  
February 14, 2023
Previous
कपाशीच्या वजनात घट ; भाववाढीबाबत 'निराशाच' !
February 14, 2023
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to धरावी  शेतीपूरक व्यवसायांची कास  !?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !