सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • शेती/
  • आंबटगोड रसाळ संत्री !

आंबटगोड रसाळ संत्री !

by सह्याद्री मराठी वृत्त 15 February 2023 0 Comments
15Feb, 2023

भारतीय फळांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. यातील बहुतांश फळे ही भारत सरकारकडून ‘जीआय’ टॅग मिळालेली  आहेत. देशाच्या विविध भागातून विदेशात फळांची निर्यात होते. अलीकडेच महाराष्ट्र , कर्नाटक,  मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशात पिकविल्या जाणाऱ्या संत्र्यांना भौगोलिक मानांकन  टॅग देण्यात आला आहे. ही फळे विशिष्ट ठिकाणची माती आणि हवामानात चांगल्या पद्धतीने तयार होतात.  त्यामुळे त्यांची चव, सुगंध, पोत आणि पोषण हे सामान्य फळांपेक्षा खास असते.

या संत्र्यांविषयी थोडेसे :

कूर्ग ऑरेंज
‘कर्नाटक कूर्ग ऑरेंज’ला भारत सरकारने ‘जीआय’ टॅग दिला आहे. पश्चिम घाटातील डोंगराळ भागात या संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. ‘कूर्ग’ संत्र्याचा आकार मध्यम असतो.  साल घट्ट असते. रंग पिवळा आणि आतील लगदा गडद केशरी, कोमल व रसाळ असतो. त्याचा रस आम्ल आणि साखर यांचे मिश्रण असलेल्या गुणवत्तेचा मानक आहे.  ‘कूर्ग’ संत्र्यांची कर्नाटकातील ‘कोडगु’, ‘हसन’, ‘चिकमंगळूर’  जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.

अरुणाचलची संत्री
ईशान्येकडील फळे आणि भाज्यांनी जगभरात पसंती मिळविली आहे. आंबट-गोड चवीची ही संत्री गोल आणि आकाराने मध्यम असते. हे ‘मँडरीन’ संत्र्यासारखेच फळ  आहे, त्यापैकी बहुतेक फळे दुबईला निर्यात केली जातात. रसाळ लगद्याने समृद्ध असणारी ‘मँडरीन’ संत्री अरुणाचलच्या मातीत आणि हवामानात चांगली वाढतात.

मणिपूरची ‘तामेंगलांग मंडारीन’ संत्री
मणिपूरच्या ‘तामेंगलांग मंडारीन’ संत्र्याबद्दल ऐकले असेलच. या संत्र्यांचे वजन 232.76 ग्रॅम पर्यंत आहे, जे त्यांच्या अद्वितीय आंबट-गोड चवीसाठी प्रसिद्ध आहे.

नागपूरची संत्री
महाराष्ट्रातील नागपुरात पिकविलेली संत्री देशभरात ‘नागपुरी’ संत्र्याच्या नावाने विकली जाते. बस आणि रेल्वे स्थानकांवर ही संत्री सहज विकली जात असल्याचे पहायला मिळते. या संत्र्यावर प्रक्रिया करून सरबत, कँडी, जेली इ. पदार्थ बनविता येत असल्यामुळे परदेशातही ‘नागपुरी’ संत्र्यांना मोठी मागणी आहे. वेळोवेळी ‘अपेडा’  आणि  महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळही मागणीनुसार दुबईसह अनेक देशांमध्ये या संत्र्यांची निर्यात करतात.

जालना नागपुरी
महाराष्ट्रातील ‘जालना’ संत्र्यांना ‘जीआय’ टॅग मिळाला आहे. या संत्र्यांमध्ये उच्च टीएसएस असते, जे गोडपणाचे सूचक आहे. हा संत्र्याचा  न्यूसेलर प्रकार आहे, ज्याची साले खूप जाड असतात. या संत्र्यांमध्ये भरपूर पोटॅशियम व नायट्रोजन हे घटकदेखील आढळतात.

Next
 'तिने' सुरु केला चक्क मृदभांडी व्यवसाय !  
February 15, 2023
Previous
   मृत्तिका उद्योगाच्या दिशेने !  
February 14, 2023
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to आंबटगोड रसाळ संत्री !?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !