हॉटेल एक चांगली संधी

हॉटेल हा सर्व ठिकाणी चालणारा एक चांगला उद्योग आहे. म्हणूनच आजच्या काळामध्ये या उद्योगाकडे अनेकजण वळू लागले आहेत.
आपण जर हॉटेल सुरू करीत असाल तर आपल्याला ते कुठे सुरु करायचे आहे हे सर्वप्रथम निश्चित करावे लागेल. आपण कॅटरिंग,खानावळ, उपहारगृह, लॉजिंग, हॉटेल, रेस्टॉरंट सुरु करू शकता. कोणतेही पर्यटनस्थळ, पुणे, मुंबई, कोल्हापूर, गोवा, नागपूर अशी शहरे, बसस्थानक, बाजार अशा ठिकाणी हॉटेल सुरु करणे फायदेशीर ठरू शकते.
हॉटेल नियोजनासाठी आपण इंटिरिअर डिझायनरची मदत घेऊन आपल्या हॉटेलला खूपच सुंदर बनवू शकता.

आपल्याला आर्थिक जोखीम टाळण्यासाठी संबंधित कायद्यामधील सर्व बदलांविषयी अचूक माहिती असणे गरजेचे असते.
आपल्या उद्योगावर नैसर्गिक आपत्तींचा परिणाम होऊ नये याची दक्षता घ्यावी लागते.
उद्योगासाठी नेहमी कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासते. हॉटेलचा आकार तसेच गरजेनुसार अनुभवी किंवा नवोदित कर्मचारी आवश्यक असतात. हे कर्मचारी मिळविण्यासाठी आपण एखादी जाहिरात देऊ शकता.
नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपला उद्योग वाढवू शकता. नवीन संकल्पना राबवू शकता. नवकल्पना ही यशस्वी उद्योगाची गुरुकिल्ली आहे.

आपण सुरु करीत असलेल्या व्यवसायासाठी आपण किती खर्च करू शकता याचा विचार सुरुवातीलाच करायला हवा. आपण जर कर्जावू पैसे घेत असू तर आपल्या क्षमतेचा विचार सुरुवातीस करायला हवा.
आपला पूर्ण वेळ आपल्या उद्योगासाठी देणे गरजेचे आहे.
अलीकडे पौर्वात्य तसेच पाश्चिमात्य देशातील खाद्यपदार्थ विकत घेण्याकडे ग्राहकांचा कल असतो. त्यामुळे हे पदार्थ उत्कृष्टपणे बनविता आले पाहिजेत. त्यासंबंधीचे प्रशिक्षण आपण घ्यायला हवे. यु ट्यूब चॅनेलवरही असे व्हिडिओ उपलब्ध असतात. त्यांचाही लाभ घेता येईल.
स्वच्छता हा घटक फार महत्वाचा आहे. आपल्या आस्थापनेत साफसफाई असणे गरजेचे असते. त्यामुळे आपल्या व्यवसायाकडे ग्राहक आकर्षित होतात.

भारतातील पारंपरिक पदार्थ जगभरातील लोकांना अतिशय आवडतात. त्यामुळे मराठमोळ्या पदार्थांबरोबरच उत्तर, पूर्व, पश्चिम व दक्षिण भारतातील पदार्थ शिकून घ्यावेत.
खाद्यपदार्थ बनवीत असताना त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूचे गुणधर्म, त्याचे उपयोग आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.
ग्राहकांशी सौजन्याने वागावे. यातच आपले व आपल्या उद्योगाचे हित असते.