
आपणांस बद्धकोष्ठता, पचन किंवा पोटाची समस्या असेल तर आपण लिंबाच्या रसाचे सेवन करू शकता. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी दोन ग्लास पाण्यात एक लिंबू आणि थोडे मीठ टाकून प्या. संध्याकाळी देखील लिंबू मिठाचे पाणी प्या. असे केल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळेल.
उलट्या होत असतील तर अर्धा कप पाण्यात लिंबाचा रस, जिरे आणि वेलचीचे दाणे मिसळून प्या. दोन तासांच्या अंतराने ते प्यायल्याने उलट्या थांबतात.
खाण्याच्या योग्य सवयी नसल्याने अन्नाचे पचन होत नाही, त्यामुळे आंबट ढेकर येणे सुरू होते. यापासून सुटका करण्यासाठी पाण्यामध्ये लिंबाचा रस, साखर आणि थोडे मीठ टाकून प्यायल्याने आराम मिळतो.

त्वचेवरील डाग आणि मुरुमांच्या समस्येने लोक अनेकवेळा त्रस्त असतात. त्यावर स्वस्त आणि फायदेशीर उपाय म्हणजे लिंबू. एक चमचा मलईमध्ये पाव भाग लिंबू पिळून घ्या आणि दररोज चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्याचा रंग साफ होतो. मुरुमांपासूनही आराम मिळतो. साधारण महिनाभर असे केल्याने तुम्हाला त्याचा परिणाम दिसून येईल.
लिंबाचा रस वजन कमी करण्यासाठी किंवा लठ्ठपणा कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. रोज सकाळी एक ग्लास पाण्यात एक लिंबाचा रस आणि दोन चमचे मध मिसळून सेवन केल्याने वजन कमी होते.
टक्कल पडण्याची तक्रार असेल तर लिंबू खूप फायदेशीर ठरू शकते. यामुळे केस गळणे थांबते. पिकलेल्या केळ्यामध्ये लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा आणि नियमितपणे डोक्याच्या मुळांवर लावा. आवळा पावडरमध्ये लिंबाचा रस मिसळून केसांना लावल्यास कोंडा दूर होतो आणि केस काळे आणि लांब होतात.
वेदनांवरही लिंबू फायदेशीर आहे. पोटदुखी किंवा दातदुखी, सांधे आणि कान दुखत असल्यास लिंबाचा रस फायदेशीर आहे.
दात दुखत असल्यास 2-3 लवंगा बारीक करून त्यात लिंबाचा रस टाका. दुखत असलेल्या दातावर लावा आणि हलक्या बोटाने चोळा.
जर आपण सांधेदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर लिंबाच्या रसाने मालिश करणे किंवा लिंबू पाणी पिणे फायदेशीर ठरते.