
आपण कधीही वृद्ध होऊ नये, कायम तरूण दिसावे असे प्रत्येकालाच वाटते. नेहमी तरूण, सुंदर दिसावे, अशी इच्छा प्रत्येकाचीच असते, नाही का?
अनेक अभिनेते, अभिनेत्री वयाची पन्नाशी उलटल्यानंतरही पंचविशीत असल्यासारखे दिसत असतात. यामागे त्यांची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, व्यायाम याची महत्वाची भूमिका असते.
शरीरातील सर्व क्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पाणी महत्वाचे आहे.
सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्या. सकाळी १ ते २ ग्लास गरम पाणी प्यायल्याने आतडे स्वच्छ राहते. पोट साफ होण्यास मदत होते. याशिवाय आजारांचा धोका टळतो. त्वचा चमकदार राहते.
थंड पाणी पिणे टाळा. उन्हाळा असो किंवा हिवाळा थंड पाणी पिऊ नका. थंड पाणी सतत प्यायल्याने मेंदू व हृदयाच्या नसांवरही परिणाम होतो. अशा स्थितीत हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. जेवल्यानंतर पाणी पिऊ नका.

आयुर्वेदीक तज्ज्ञांच्या मते, जेवल्यानंतर लगेचच थंड पाणी पिऊ नका. जेवल्यानंतर अन्न पचविण्यासाठी वेळ द्यावा लागतो. जर तुम्ही लगेचच पाणी प्यायलात तर जठराग्नी थंड पडतो. यामुळे अन्न पचण्याची क्रिया थंड होते. जेवल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी पिणे उत्तम ठरते.
कायम तरूण दिसण्यासाठी आपल्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने नव्हे तर पाण्याने करा. याचे कारण असे की पाण्यामुळे त्वचेच्या ऊतींची भरपाई होण्यास मदत होते.
रोज बदाम आणि अक्रोड खा. यामध्ये असलेले ‘ई’ जीवनसत्व त्वचेचे पोषण करते.
प्रथिनयुक्त अन्न जेवा. ते खराब झालेल्या ऊतींना बरे करण्यास आणि दुरुस्त करण्यास मदत करते. नियमित प्राणायाम- योगासने करा.