घरच्या घरी करता येण्यासारखा पापड उद्योग
पापडाचे अनेकांच्या हृदयात विशेष स्थान आहे. महाराष्ट्रीयन, राजस्थानी किवा गुजराती थाळी असो, या थाळीत कुरकुरीत पापडला विशेष स्थान आहे. त्याशिवाय जेवणाला चवही येत नाही. ‘लिज्जत’ पापड, जो 1959 मध्ये दक्षिण मुंबईतील सात महिलांनी 80 रुपयांच्या भांडवलाने सुरू केलेला उद्योग होता. यापूर्वी केवळ 50 पैशांच्या नफ्यात या महिलांना हा व्यवसाय सुरू करता आला होता.

कोणताही खाण्याचा उद्योग सुरू करायचा असल्यास सर्वप्रथम आपल्याला एफएसएसआयचा परवाना आवश्यक आहे. त्यानंतर बीआयएसचा परवाना आवश्यक आहे. जर आपले दुकान असेल तर त्याची नोंदणी करायला हवी. त्यामुळे आपल्याला कर्ज मिळणे सोपे जाते. पापड उद्योग सुरू करण्यासाठी जागेचा विचार केल्यास आपण हा व्यवसाय लहान करणार आहात की मोठा यावर सर्व अवलंबून आहे. साधारणपणे आपल्याला 70 ते 80 चौरस मीटर एवढी जागा लागते.
ही जागा उपलब्ध नसेल तर आपण हा व्यवसाय एका लहान खोलीमध्ये सुद्धा सुरू करू शकता. पापड सुकविण्यासाठी टेरेसचा वापर करू शकता. पापड विविध पदार्थांपासून बनविले जातात. त्यामध्ये डाळी (उडीद, हरभरा, मूग इ.), बटाटे, साबुदाणा, रवा इ. पदार्थ असतात. त्यामुळे कोणत्या प्रकारचे पापड बनविण्याचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यानुसार साहित्य मागवू शकता.

रोजच्या आवश्यक वस्तूही ह्यासाठी गरजेच्या पडतात जसे की मीठ, हिंग, जिरे, मिरची, तेल, काही मसाले तसेच उडदाची डाळ,काळी मिरी, लाल मिरची, मीठ, हिंग, तूप किंवा तेल, सोडियम बायकार्बोनेट,पाणी हे पदार्थ लागतात.आपण हा व्यवसाय यंत्रसामग्रीशिवाय करू इच्छित असाल तर आपल्याला 5 ते 10 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो.