Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

मूत्रपिंड विकारांसाठी उपयुक्त गोखरू

‘गोखरू’ म्हणजेच ‘सराटा’ होय. हे एक औषधी फळ आहे. ज्या लोकांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा वैद्यकीय सल्ला देण्यात आला आहे, त्यांच्यासाठी हे उत्तम औषध आहे.

२५० ग्राम गोखरू (फळ) घेऊन त्यास थोडे कुटून घ्यावे. त्यात ४ लिटर पाणी घालावे. हे मिश्रण इतके उकळावे की भांड्यात पाणी १ लिटर शिल्लक राहील. थंड झाल्यावर हे मिश्रण गाळून एका काचेच्या स्वच्छ बाटलीत भरून ठेवावे. चोथा फेकून द्यावा. रोज सकाळी काहीही न खातापिता, रिकाम्यापोटी त्यापैकी १०० मिली पाणी पिण्याजोगे गरम करून प्राशन करावे. तसेच दुपारच्या जेवणानंतर ५-६ तासांनी याप्रमाणेच १०० मिली पाणी घ्यावे.

हा काढा घेतल्यानंतर १ तास काहीही खाऊ पिऊ नये. तसेच, आपला नेहमीचा औषधोपचार, जेवण वगैरे पूर्ववतच सुरू ठेवावे. त्रास कमी झाल्यावर ८-१० दिवसांनी याचे प्रमाण सकाळी फक्त १ वेळा असे करता येईल.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *