पुणे कटक मंडळात नोकरीची संधी
पुणे शहरात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. पुणे कटक मंडळात विविध पदांसाठी नोकरभरती केली जाणार आहे. यासाठी मंडळाने १६८ पदांसाठी अर्ज मागविले आहेत. आपण जर कटक मंडळामध्ये नोकरीसाठी इच्छुक असाल तर, पुणे कटक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकता.

ही भरती प्रक्रिया साफसफाई कामगार, कनिष्ठ लिपिक, माळी आणि मजूर तसेच संगणकीय कामे अशा विविध पदांसाठी केली जाणार आहे. या पदांसाठीचे अर्ज उमेदवारांकडून मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची पात्रता वेगवेगळी आहे. सातवी उत्तीर्ण ते पदवीधारक या पदांसाठी अर्ज करु शकतात. ही भरती १६८ जागांसाठी करण्यात येणार आहे.

भरतीसाठी अधिकृत अधिसूचना २२ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर करण्यात आली आहे. या पदासांठीची शैक्षणिक पात्रता भिन्न असल्यामुळे ती सविस्तर जाणून घेण्यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.या लिंकवर आपणांस सविस्तर माहिती मिळेल.
(https://wpassets.adda247.com/wp-content/uploads/multisite/2023/02/23223706/paperad-local.pdf)