Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

सर्व इंधनसुविधांनी परिपूर्ण कार

‘टाटा’ पासून ‘महिंद्रा’ पर्यंत काही कंपन्या भारतात अशा कारची विक्री करतात, ज्यामध्ये सर्व इंधनसुविधा असतात. भारतीय बाजारात पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये ऑफर केल्या जातात.
टाटा टियागो
टाटाकडून ‘टियागो’ अशी हॅचबॅक कार आहे, जी पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये आणली गेली आहे. ‘टियागो’ ची लवकरच देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारसुद्धा येत आहे. पेट्रोल-इंजिन सोबत ‘टियागो’ची सुरुवातीची किंमत ५.५४ लाख रुपयांपासून सुरू होते. सीएनजीसोबत या कारला ६.४४ लाख रुपयाच्या एक्स शोरूम सोबत खरेदी करू शकता. इलेक्ट्रिक व्हर्जनची एक्स शोरूम किंमत ८.६९ लाख रुपयांपासून सुरू होते.

टाटा नेक्सॉन : टाटाकडून ‘नेक्सॉन’ ही दुसरी एसयूव्ही म्हणून उपलब्ध आहे. ‘नेक्सॉन’ ला पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक ऑप्शन सोबत खरेदी करू शकता. पेट्रोल ‘नेक्सॉन’ ची सुरुवातीची किंमत ७.८० लाख रुपये आहे. याचे डिझेल व्हेरियंट १० लाख रुपयाच्या सुरुवातीच्या एक्स शोरूम किंमतीत खरेदी करू शकता. याशिवाय, ‘नेक्सॉन’ इलेक्ट्रिकची सुरुवातीची किंमत १४.४९ लाख रुपयांपासून सुरू होते.

टाटा टिगोर : टाटाची ‘टिगोर’ ही तिसरी सेडान कार आहे. कंपनी ‘टिगोर’ पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक व्हेरियंट्समध्ये ऑफर करते. पेट्रोल ‘टिगोर’ ची एक्स शोरूम किंमत ६.२० लाख रुपयांपासून सुरू होते. सीएनजी सोबत ‘टिगोर’ला ७.६० लाख रुपयांची एक्स शोरूम किंमत आहे. तर इलेक्ट्रिक ‘टिगोर’ची सुरुवातीची किंमत १२.४९ लाख रुपये आहे.

महिंद्रा एक्सयूव्ही : महिंद्राकडून ‘एक्सयूव्ही’ पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये मिळते. एक्सयूव्ही ३०० आणि ४०० ची डिझाइन, लांबी, रुंदी आणि उंची एकसारखी आहे. फक्त इंजिन आणि मोटरमध्ये फरक आहे. म्हणून यात ३०० आणि ४०० लिहिलेले असते. पेट्रोल इंजिनच्या ‘एक्सयूव्ही’ ३०० ला ८.४१ लाख रुपये किंमतीत खरेदी करू शकता. याच्या डिझेल व्हेरियंटची सुरुवातीची किंमत ९.६० लाख रुपये ठेवण्यात आली आहे. याच्या इलेक्ट्रिक एसयूव्ही ४०० ची सुरुवातीची किंमत १५.९९ लाख रुपये आहे.

सिट्रॉएन सी 3 : फ्रान्स कार कंपनी ‘सिट्रॉएन’ कडून ‘सिट्रॉएन सी 3’ ला पेट्रोल इंजिन सोबत ऑफर केले जात आहे. या कारला कंपनीकडून इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये ‘ईसी ३’ म्हणून आणले गेले आहे. सहा महिन्यात कंपनीकडून आयसीई सोबत ईव्ही ऑप्शनला भारतीय बाजारात आणले गेले आहे. या कारच्या पेट्रोल सोबतच्या ‘सी ३’ ची किंमत ५.९८ लाख रुपये आहे. तर याच्या इलेक्ट्रिक व्हेरियंटची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत ११.५० लाख रुपये आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *