भारतीय संसदेत नोकरीची संधी
सर्वसामान्य भारतीयांच्या मनात भारतीय संसदेबद्दल नेहमीच कुतूहल आणि त्याबाबत माहिती जाणून घेण्याची इच्छा असते. तरुणांसाठी या संसदेमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय लोकसभा सचिवालयाने त्यांच्या अधिकृत https://loksabha.nic.in/ या संकेतस्थळावर भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार ‘संसदीय दुभाषी’ पदासाठी १३ जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार ३ एप्रिल २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात.

भारतीय संसद भरती अधिसूचना ७ मार्च २०२३ रोजी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण १३ जागा भरण्यात येणार आहेत. त्या पदांपैकी ८ जागा ‘इंग्रजी’ आणि ‘हिंदी’ दुभाषीसाठी तर ‘डोंगरी’, ‘काश्मिरी’, ‘कोकणी’, ‘संथाली’ आणि ‘सिंधी’ प्रादेशिक भाषा दुभाषींसाठी ५ जागा असणार आहेत. उमेदवारांची अंतिम निवड भरती प्रक्रियेच्या विविध टप्प्यांमध्ये पात्र ठरल्यानंतर होईल. भरतीसाठी ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख ७ मार्च असून शेवटची तारीख ३ एप्रिल २०२३ आहे.

संसदेच्या अधिकृत संकेतस्थळावर पात्र आणि इच्छुक भारतीय नागरिकांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी या https://pvp.nic.in/Interpreter/ लिंकला भेट द्यावी.