बचतीसाठी डाक सेवेचा लाभ घेताना
एखाद्या पगारदार व्यक्तीसाठी आपल्या पगारातील काही रकमेची बचत करणे सर्वात मोठी गरज असते. यासाठी पहिले पाऊल म्हणजे बचत खाते उघडणे होय. बचतीसाठी अनेक जण डाकसेवेस (post office) प्राधान्य देतात. डाक सेवेच्या खात्यात बचत खाते उघडून आपली शिल्लक ठेवली जाते. हे बचत खाते ऑनलाइन किंवा ऑफलाइन, डाक विभागाचे कार्यालय किंवा कोणत्याही बँकेत उघडले जाऊ शकते. डाक सेवा विभाग ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी अनेक मार्ग प्रदान करतो. त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी अनेक पर्याय देतात. या पद्धतींमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतींचा समावेश आहे.

या बचत खात्यातील शिल्लक एसएमएसद्वारे तपासू शकता. एसएमएसद्वारे शिल्लक रक्कम जाणून घेण्यासाठी, ग्राहकांनी ‘बॅलन्स’ असे टाइप करून ७७३८०६२८७३ वर पाठवावे. काही मिनिटांत तुम्हाला आपली शिल्लक मिळेल.

नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून ८४२४०५४९९४ वर मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि काही मिनिटांतच तुमच्या खात्यातील शिल्लक एसएमएसद्वारे येईल. डाक सेवेच्या बचत खात्याची शिल्लक रक्कम जाणून घेण्याचा ‘आयपीपीबी मोबाईल ॲप’ हा आणखी एक मार्ग आहे. या ॲपद्वारे तुम्हाला सहजपणे तुमची शिल्लक समजेल. ग्राहक त्यांच्या खात्यातील शिल्लक जाणून घेण्यासाठी ई-पासबुक सेवा किंवा ‘इंटरएक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टीम’ देखील वापरू शकतात.
‘आयव्हीआरएस’ द्वारे शिल्लक तपासण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून १५५२९९ वर कॉल करणे आणि सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.