Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

सिंधुदुर्गातील निवती किनारा

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळपासून साधारण २५ किमी वर ‘निवती’ चा सागरकिनारा आहे. ‘कुडाळ-पाट-म्हापण-निवती’ असा हा प्रवास आहे. खाडीच्या दक्षिणेकडे ‘निवती’ बंदर तर उत्तरेकडे ‘श्रीरामवाडी’ बंदर आहे. ‘निवती’ ला विजयालक्ष्मी पंडितांचे घर आणि आंब्याची विस्तीर्ण बाग आहे. निवतीला सकाळी आकाश निरभ्र असेल तर सुर्योदयाची छायाचित्रे छान मिळतात. गावाच्या पश्चिमेस ‘निवती किल्ला’ समुद्रात पाय पसरून उभा आहे. या किल्ल्यावर पडके बुरूज, खंदक आणि बऱ्यापैकी झाडी आहे. क्वचित मोर आणि जंगली प्राणीही दिसतात. ‘भोगव्या’ च्या बाजूने थोडीशी दमछाक करणारी चढण आहे. किल्ल्यावरून भोगव्याचा किनारा अत्यंत सुंदर दिसतो.

निवती सागरकिनार्‍यावरून तासनतास जाऊ नये असे वाटते. संध्याकाळी सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य दिसते. भोगवे-निवती किल्ला-निवती गाव व त्यापुढील किनारा असे चालत गेल्यास एक दिवसाची छान सहल होते. साहसाचाही आनंद मिळतो. किनाऱ्यावरील खडकामध्ये अनेक समुद्री जीव आढळतात. ‘कुडाळ-पाट-परूळे-भोगवे’ असेही जाता येते. भोगव्याच्या किनाऱ्यावरून ‘निवती’ किल्ल्यावर चढता येते. पाट येथील गावतळ्यामध्ये वेगवेगळ्या रंगांची कमळे आहेत. या विस्तीर्ण तळ्याच्या पश्चिमेस दलदलीच्या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी नेहमी दिसतात.

‘म्हापण-पाट-परूळे-केळूस’ हा संपूर्ण रस्ता वळणावळणाचा असून नारळी-पोफळीच्या बागेतून जातो. हा प्रवास कधीच संपू नये असे वाटते.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *