
‘पोको’ कंपनी आपला नवीन स्मार्टफोन ‘पोको एक्स 5 जी’ ला भारतीय बाजारपेठेत दाखल करीत आहे. या फोनमध्ये कंपनीने १३ जीबी रॅम आणि ५जी बँड्सचा सपोर्ट दिला आहे. तसेच डोळ्यांच्या सुरक्षेसाठी खास ‘ब्लू लाइट प्रोटेक्शन’, ‘रिडिंग मोड’ आणि ‘सनलाइट मोड’ सारखे फीचर्स दिले आहेत. पोकोच्या या फोनच्या ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी व्हेरियंटची किंमत १८ हजार ९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २० हजार ९९९ रुपये आहे. ग्राहकांना पहिल्या सेलमध्ये ‘पोको’चा हा फोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळू शकते. ६ जीबी रॅम फोनला १६ हजार ९९९ रुपये तर ८ जीबी रॅम फोनला १८ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता.

या फोनची पहिली विक्री २१ मार्च २०२३ रोजी फ्लिपकार्टवरून सुरू केली जाणार आहे.पोकोच्या या अत्याधुनिक 5 जी फोनमध्ये २४० हर्ट्ज टच सॅम्पॅलिंग रेट सोबत ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये १२० हर्ट्जचा रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळेल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी पोकोच्या या फोनमध्ये ६nm प्रोसेसवर बेस्ड स्नॅपड्रॅगन ६९५ प्रोसेसर दिले आहेत. या फोनचे बेस व्हेरियंट १२८ जीबी स्टोरेज आहे. याला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबी पर्यंत वाढविता येवू शकते. फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि ८ जीबी रॅम दिले आहे. तसेच ५ जीबी व्हर्च्युअल रॅम सपोर्ट दिला आहे. या फोनच्या बॅक पॅनेलवर ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा, १३ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेन्सर दिला आहे. या फोनला पॉवर देण्यासाठी ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. जी ३३ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.