बजाज पल्सर नव्या व्हेरियंटमध्ये

‘बजाज ऑटो’ ने देशात ‘पल्सर एनएस १६०’ आणि ‘एनएस २०० नेकेड स्ट्रीटफायटर’ला नवीन व्हेरियंटमध्ये लाँच केले आहे. नवीन ‘पल्सर एनएस १६०’ आता १ लाख ३४ हजार ६७५ रुपये किंमतीत उपलब्ध आहे, जी २०२२ मॉडेलच्या तुलनेत ९ हजार ६५१ रुपये जास्त महाग आहे. तर नवीन ‘एनएस २०० नेकेड स्ट्रीटफायटर’ आता १ लाख ४७ हजार ३४७ रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे, जी २०२२ च्या मॉडेलच्या तुलनेत ६ हजार ६८१ रुपये जास्त महाग आहे.

‘बजाज पल्सर एनएस १६०’ च्या इंजिनला 5-स्पीड गियरबॉक्सशी जोडले आहे. हे पॉवरट्रेन आता बी एस 6 फेज-2 नियमानुसार आणि इ 20 फ्यूएलसाठी तयार करण्यात आले आहे. 2023 बजाज पल्सर ‘एनएस २०० नेकेड स्ट्रीटफायटर’ मध्ये तेच 199 सीसी, लिक्विड-कूल्ड इंजिन मिळते. जे 24.5 पीएस पॉवर आणि 18.5 एनएम टार्क जनरेट करते.या दोन्ही बजाज पल्सरमध्ये 33mm युएसडी फ्रंट फोर्क सोबत येतात. हे पेटल डिस्क ब्रेक आणि बायब्रे कॅलिपर्सशिवाय सर्क्युलर डिस्क आणि ग्रिमेका कॅलिपर्ससोबत येतात.

फ्रंट डिस्कची साइज 260 मिमीने वाढवून 300 मिमी करण्यात आली आहे. ही साइज एनएस 250 आणि एफ 250 मध्ये सुद्धा येते. यात डुअल चॅनेल एंटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम स्टँडर्ड दिले आहे. यात नवीन १७ अलॉय इंच दिले आहेत. बाइकमध्ये अपडेटेड सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंटल कंसोल दिले आहे, जे गियर पोझिशन इंडिकेटसोबत येतात. याशिवाय, आधीच्या मॉडेलमध्ये मिळणारे सर्व फीचर्स यात दिले आहेत. परंतु, यात ‘स्मार्टफोन कनेक्टिविटी’ आणि ‘नेव्हिगेशन’ फीचर्स दिले नाही.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *