
शेवयांसाठी साहित्य : ४ वाट्या तांदळाचे पीठ, मीठ चवीनुसार आणि पाणी
नारळाचा रस बनविण्यासाठी साहित्य:
ओले खोबरे २ वाट्या, १ वाटी किसलेला गूळ, मीठ चवीनुसार,वेलची पूड, आवडत असल्यास हळद
शेवयांची कृती:
तांदळाच्या पीठात मीठ व गरम पाणी घालून थोडे घट्ट मळून घ्यावे. एका पातेल्यात जास्तीचे पाणी गरम करत ठेवावे. पाण्याला उकळी आली की वरील पिठाचे बेताच्या आकाराचे लांबट गोळे करून त्यात सोडावे. आता हे गोळे १०-१५ मिनिटे उकडू द्यावे. गोळे शिजले की ते शिजून वर येतात. हे गोळे मग बाहेर काढावेत. गरम असतानाच शेवयाच्या सोऱ्यात (चकली यंत्रातील सोरेसुद्धा चालतात.) घालून लगेचच शेवया पाडून घ्याव्यात. आपल्या शेवया तयार आहेत.

नारळाचा रस बनविण्याची कृती :
ओले खोबरे थोडेसे पाणी घालून मिक्सरला लावून घ्यावे. आता या खोबऱ्याचे दूध काढून घ्यावे. त्या दुधात किसलेला गूळ, वेलची पूड व थोडेसे मीठ घालून चांगले ढवळून घ्यावे. आवडत असल्यास हळद घालावी.
या शेवया खाण्यासाठी देताना एका मोठ्या थाळीत शेवया, त्याच्या बाजूला खोलगट भांड्यात रस आणि लहान चमचा ठेवून द्याव्यात. खाणारा शेवया रसात घालून चमच्याने त्याचा यथेच्छ स्वाद घेईल.