अळंबी
अळंबी शेती हा मुळात बुरशी पिकविण्याचा व्यवसाय आहे. आज अळंबीची लागवड हा भारतातील सर्वात उत्पादक आणि फायदेशीर व्यवसाय आहे. हा व्यवसाय भारतात हळूहळू लोकप्रिय होत आहे; कारण, अल्पावधीत तो शेतकर्यांच्या मेहनतीचे फायद्यात रूपांतर करीत आहे. अळंबीची लागवड ही भारतातील पैशाचा पर्यायी स्रोत म्हणून शेतकरी करतात. अळंबी खायला चविष्ट असतात. आपण याचे सूप, भाज्या बनवू शकतो. आपल्या आवडत्या पिझ्झावर ते वापरू शकतो. अळंबी शेती केवळ पौष्टिक आणि औषधी दृष्टिकोनातूनच नाही तर निर्यातीसाठीही ही शेती केली जाते. त्यासाठी आपल्याला थोडी जागा किंवा जमीन असणे आवश्यक आहे, जे लोक भूमिहीन आणि अत्यल्प भूधारक आहेत ते एखादी खोली भाड्याने घेऊन ही शेती करू शकतात.

अळंबी शेतीचे उत्पादन सूर्यप्रकाशाशिवाय, सेंद्रिय खतावर आणि सुपीक माती शिवाय याची वाढ होते. अळंबी शेतीमध्ये उत्पादन देण्याची प्रचंड क्षमता आहे. ही शेती करण्यासाठी आपण वरचा मजला किंवा मोकळ्या हवेच्या खोलीत देखील ह्याची सुरुवात करू शकता. अळंबी शेती करण्यासाठी आपल्याला कमी जागा लागते, आपण 20 X 20 फूट जागेच्या खोलीत याची सुरुवात करू शकता. आठवड्याला कमीत कमी 50 किलो उत्पादन काढू शकता. हा एक असा व्यवसाय आहे की तुम्ही कमी आठवड्यात पैसे कामवायला सुरुवात करू शकता. आपल्याला जर आणखी या व्यवसायामध्ये वाढ करायची असेल तर एखादी खोली भाड्याने घेऊन आपला व्यवसाय वाढवू शकता.
अळंबी शेती करण्यासाठी माहिती करून घेणे गरजेचे आहे. अळंबी शेती करण्यासाठी आपल्याला अभ्यास आणि अनुभव असणे आवश्यक आहे, यासाठी आपण ऑनलाइन किवा एखाद्या कृषी विभागाच्या ठिकाणी जाऊन प्रशिक्षण घेऊ शकता.तसेच आपण जे जुने अळंबी व्यवसाय आहेत, त्याठिकाणी जाऊन याविषयी माहिती करून घेऊन शकता. याचे प्रशिक्षण घेत असताना आपल्याला अळंबी पिकविण्याचे तंत्रज्ञान याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. या व्यवसायासाठी पेंढा आणि अंडी, 400 गेज जाडीची प्लास्टिक शीट, लाकडी साचा, पेंढा कापण्यासाठी हँड चॉपर, किंवा चाफ कटर, पेंढा उकळण्यासाठी ड्रम (किमान दोन), ज्यूट दोरी, नारळ दोरी, किंवा प्लास्टिक दोरी, गोणी पिशव्या, स्प्रेअर, स्ट्रॉ स्टोरेज शेड हे साहित्य लागते.

अळंबी वाढविण्यासाठी सामान्यतः भूसा किंवा लाकूड पॅलेट वापरतात. अळंबी ला आवडणारा ‘सब्सट्रेट’ बनविण्यासाठी, तुम्हाला सेंद्रिय सॉफ्टवुड इंधन गोळ्या, लाकूड चिप्स आणि ‘सोया हल्स’ खरेदी करावे लागतील. मग तुम्हाला हे दोन घटक ‘बायोडिग्रेडेबल’ पिशवीत मिसळावे लागतील, आणि नंतर योग्य आर्द्रता मिळविण्यासाठी पाणी घालावे लागते.आपण घरामध्ये किवा बाहेर या दोन्ही ठिकाणी अळंबीची वाढ करू शकतो. ‘वाइल्ड मशरूम’ हे फायदेशीर आणि वाढण्यास सोपे आहेत आणि त्यांचे काही औषधी फायदे देखील आहेत.
आज मार्केटमध्ये बटन अळंबीची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे या प्रकारची शेती करण्यासाठी लोक प्राधान्य देत आहेत. जगभरातील अधिकाधिक सुपरमार्केट आणि किराणा माल ‘पिंक ऑयस्टर मशरूम’ सारख्या विदेशी अळंबीचा साठा करत आहेत. अळंबी मध्ये प्रथिने, फायबर आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. मशरूम नाजुक असतात, त्यासाठी त्याची हाताळणी आणि काळजी घेणे महत्त्वपूर्ण आहे. याची वाहतूक करीत असताना आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते. आज मोठ्या प्रमाणावर अळंबीची मागणी आहे, मात्र अळंबीचा पुरवठा कमी आहे. आपल्याकडे उत्पादन जास्त असल्यास ग्राहक आपल्याला जास्त दर देऊन खरेदी करण्यासाठी मागे लागतात. याचे आपण ‘ऑनलाइन शॉप’ देखील उघडून उत्पादन विकू शकतो.