
‘रेडमी नोट 12 टर्बो’ २८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता चीनच्या बाजारपेठेत दाखल होणार आहे.
मार्चमध्ये येणारा हा पहिला फोन असेल, ज्यामध्ये टॉप एन्ड स्नॅपड्रॅगन ७ सीरीज चीप आहे. तारखेच्या घोषणेनंतर कंपनीने ‘पोस्टर’च्या माध्यमातून हँडसेटच्या डिझाइनची पहिली झलकसुद्धा दाखविली आहे. या डिव्हाइसच्या मागच्या बाजूला ६४ मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा यूनिट मिळणार आहे. साइड माऊंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर प्लेस केले जाणार आहे. याशिवाय, ‘नोट १२ टर्बो’ ला एक मायक्रोफोन, एक आयआर ब्लास्टर, एक स्पीकर ग्रील, एक ३.५ एमएम ऑडियो जॅक आहे. हा फोन भारतीय बाजारपेठेत कधी दाखल होणार, यासंबंधीची माहिती अद्याप कंपनीकडून देण्यात आलेली नाही.

‘रेडमी नोट १२ टर्बो’ मध्ये 120 हर्टझ रिफ्रेश रेट आणि फुल एचडी रिझोल्यूशन सोबत ६.६७ इंचाचा फ्लॅट ओएलईडी स्क्रीन दिली जाणार आहे. हा फोन ‘एमआययूआय १४ ‘वर आधारित ‘अँड्रॉइड १३ ऑपरेटिंग सिस्टीम’ वर काम करणार आहे. याशिवाय, या फोनमध्ये ६७ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली जावू शकते. या फोनमध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेज पहायला मिळू शकते. तसेच या फोनच्या फ्रंटमध्ये १६ मेगा पिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. फोनच्या रियरमध्ये ५० मेगापिक्सलचा-मेन, प्लस ८ मेगापिक्सलचा-अल्ट्रा वाइड, प्लस २ मेगापिक्सलचा-मायक्रो ट्रिपल कॅमेरा यूनिट मिळण्याची शक्यता आहे.