सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • व्‍यवसाय/
  • गोष्ट स्पायकर जीन्सच्या निर्मितीची

गोष्ट स्पायकर जीन्सच्या निर्मितीची

by सह्याद्री मराठी वृत्त 27 March 2023 0 Comments
27Mar, 2023

संकटातही काहीजणांना संधी दिसते. या संधीचा अचूक फायदा घेत यशस्वी माणसे जीवनाचे सोने करतात. उद्योजकीय वृत्ती असणाऱ्या व्यक्ती नवनिर्मिती करून उत्तम व्यवसाय करतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘स्पायकर जीन’ निर्माण करणारे मुंबईतील प्रसाद पाब्रेकर हे व्यक्तिमत्व! मुंबईतील या मराठी व्यक्तीने भविष्यातील संकटात घट्ट पाय रोवून उभे राहण्यासाठी उत्तम सर्जनशीलतेचा वापर केला. पाब्रेकर यांच्या वडिलांचा मुंबईत लाँड्रीचा व्यवसाय होता. प्रसाद पाब्रेकर त्यांना व्यवसायात मदत करायचे. ते अभ्यासात हुशार होते. उच्च शिक्षण संपादन करून ते अभियंता झाले.

सन १९९१ मध्ये भारताने मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली. या जागतिकीकरणात विदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करून त्यांचा माल विकणार होत्या. याचा स्वदेशी उत्पादनावर परिणाम होऊ नये यासाठी पाब्रेकर यांनी नवनिर्मितीस वाव दिला. मुळात, जागतिकीकरणाआधीच जीन्स भारतात येऊन पोहोचल्या होत्या. मात्र, महाविद्यालयीन विद्यार्थी विदेशी जीन्स वापरीत होते; कारण भारतात चांगल्या दर्जाची जीन्स तयार होत नव्हती.

लाँड्रीत काम करीत असताना प्रसाद पांब्रेकर यांचा एकूणच जीन्सविषयी चांगला अभ्यास झाला होता. त्यांनी स्वत: ची जीन्स कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला. इ. स. १९९२ मध्ये प्रसाद पांब्रेकर यांनी कसेबसे १ लाख रुपये जमवून कामास सुरुवात केली आणि ‘स्पायकर जीन्स’ची निर्मिती झाली. त्यांचे स्वप्न मोठे होते. आपल्या जीन्सची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय दर्जाची ठेवावी, असे त्यांनी पहिल्यापासूनच ठरविले होते; मात्र आपल्या व्यवसायाची, उत्पादनाची जाहिरात कशी करावी, याचा अनुभव नसल्यामुळे पाब्रेकर यांना पहिल्याच वर्षी १० लाख रुपयांचे नुकसान झाले. या जागी अन्य कोणी असते तर व्यवसाय सोडून सरळमार्गी नोकरी केली असती; परंतु प्रसाद पाब्रेकर यांनी चिकाटी सोडली नाही. तरुण असल्यामुळे फॅशनबाबत जाणीव चांगली होती, तरुणांची अभिरुची कशात आहे, याचेही ज्ञान होते. त्यांनी विदेशी उत्पादने कशी आहेत, त्यात कोणत्या त्रुटी आहेत याचा अभ्यास करून आपले काम सुरुच ठेवले. हळुहळु ‘स्पायकर जीन्स’ लोकांना आवडू लागल्या. पाब्रेकर यांनी नवीन ‘ट्रेंड’स बनविले.

जीन्सची कसोटी घेत असताना त्यांनी पुतळ्याऐवजी माणसावर प्रयोग केले. एकविसाव्या शतकात ‘स्पायकर’ ही भारतातील अव्वल कंपनी बनली. आंतरराष्ट्रीय कंपन्यांना जोराची टक्कर देऊ लागली. आता ही कंपनी कोट्यवधींची उलाढाल करीत आहे. केवळ जीन्सच नव्हे तर टी शर्टस व इतर वस्त्रेनिर्मितीतही ही आघाडीची कंपनी बनली आहे. विदेशातील मोठमोठ्या मॉलमध्येही ‘स्पायकर’ जीन्स विक्रीस ठेवलेल्या दिसतात. मराठी माणूस व्यवसायात यशस्वी होऊ शकत नाही असे म्हणतात; मात्र प्रसाद पाब्रेकर यांनी ते खोडून काढले आहे.

Next
शेंगवर्गीय गवार
March 27, 2023
Previous
सुवर्ण तंतू उद्योग
March 27, 2023
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to गोष्ट स्पायकर जीन्सच्या निर्मितीची?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !