सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • शेती/
  • शेती मुळा

शेती मुळा

by सह्याद्री मराठी वृत्त 28 March 2023 0 Comments
28Mar, 2023

भाजीपाला पिकांमध्ये मुळा एक रब्बी पीक असून हिवाळ्यात त्याची लागवड उत्तम होते. मुळा लागवडीसाठी जमीन साधारण हलकी, रेताड, मध्यम आणि चांगल्या निचऱ्याची असावी. ‘सपाट वाफे’ किंवा ‘सरी वरंबा’ पद्धतीने देखील आपण मुळ्याची लागवड करू शकता. उष्ण हवामानात चांगल्या वाढू शकणाऱ्या मुळ्याच्या जाती हल्ली विकसित करण्यात आल्या आहेत. यामुळे आता मुळ्याचे पीक जवळजवळ वर्षभर घेता येते.

मुळ्याचे जमिनीत वाढणारे मूळ आणि वरचा हिरवा पाला यांचा भाजीसाठी उपयोग केला जातो. मुळा कच्चाही खातात, त्याची शिजवून भाजी करतात, तो लोणच्यातही वापरतात. मुळ्याच्या हिरव्या पाल्याची तसेच त्याच्या शेंगांचीही भाजी करतात. मुळ्याच्या‍ हिरव्या पानांमध्ये तसेच मुळ्यामध्ये ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्वे असतात. मुळ्यामध्ये चुना, फॉस्फरस, पोटॅशियम ही खनिजे असतात. ‘जपानीज व्हाईट’,’ गणेश सिंथेटीक’, ‘पुसा हिमानी’, ‘पुसा देशी’, ‘पुसा चेतकी’, ‘पुसा रेशमी’, या मुळ्याच्या काही जाती आहेत.

मुळ्याची लागवड करताना जमिनीची मशागत चांगली करणे आवश्यक आहे. पिक कमी कालावधीत तयार होणारे असल्यामुळे सुरूवातीच्या काळात पिक तणरहीत करावे लागते. साधारणपणे दोन निंदण्या‍ करून घ्याव्या लागतात. काळी अळी, मावा, करपा या रोगांना मुळा बळी पडतो. मुळ्याची लागवड केल्यानंतर 40 ते 55 दिवसांनी मुळे काढणीसाठी तयार होतात. मुळे नाजूक आणि कोवळी असतानाच मुळ्याची काढणी करावी.

मुळा जास्त दिवस जमिनीत राहिल्यास कडक, ति‍खट होतो. तो खाण्यास योग्य राहत नाही. मुळे काढण्यापूर्वी शेतीला पाणी द्यावे आणि नंतर हाताने उपटून काढावीत. विक्रीस पाठविताना मुळे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत. किडलेली, रोगट मुळे बाजूला करावीत. मुळे पाल्यासह काढून विक्रीसाठी पाठवावीत. काढणीवेळेस मुळे जमिनीत मोडणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

Next
लोकर वस्त्रोद्योग
March 29, 2023
Previous
लोहारकाम
March 28, 2023
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to शेती मुळा?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !