सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी
Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 124
सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • माहिती/
  • असा घ्या वातानुकूलित यंत्राचा लाभ

असा घ्या वातानुकूलित यंत्राचा लाभ

by सह्याद्री मराठी वृत्त 29 March 2023 0 Comments
29Mar, 2023

बाहेर रणरणते ऊन आणि घरात किंवा कार्यालयात वातानुकूलित यंत्र यांचे समीकरण अगदी छान जुळून आलेले असते, नाही का ? याचा लाभ जर आपण घेत असू तर या यंत्राचा वापर पद्धतशीरपणे कसा करून घ्यावा, याची माहिती असणे जास्त गरजेचे आहे. एका कार्यकारी अभियंत्याने सांगितल्याप्रमाणे हे यंत्र २६ अंशांवर ठेवावे. बऱ्याच लोकांना २० ते २२ अंश से. तापमानात हे यंत्र सुरु ठेवण्याची सवय असते. कालांतराने जेव्हा थंडी जाणवू लागते, तेव्हा हे बहाद्दर हळूच अंगावर चादर पांघरून घेतात. यामुळे दुहेरी तोटा होतो. मुळातच, आपल्या शरीराचे तापमान ३७ अंश से. आहे. आपले शरीर २३ अंश ते ३९ अंशांपर्यंतचे तापमान सहजपणे सहन करू शकते. याला मानवी शरीराची ‘तापमान सहनशीलता’ असे म्हणतात. जेव्हा खोलीचे तापमान कमी किंवा जास्त असते तेव्हा शरीर शिंका देणे, थरथरणे अशा पद्धतीने प्रतिक्रिया देत असते. त्यामुळे ते सर्वस्वी अयोग्य आहे.

जेव्हा आपण यंत्र १९ पासून २१ अंशांवर नेता, तेव्हा खोलीचे तापमान सामान्य शरीराच्या तपमानापेक्षा खूपच कमी असते. यामुळे शरीरात ‘हायपोथर्मिया’ नावाची प्रक्रिया सुरू होते. म्हणजे शरीरातील रक्ताच्या अभिसरणांवर परिणाम होतो. शरीराच्या काही भागात रक्तपुरवठा पुरेसा होत नसतो. असे आपण दीर्घकाळापर्यंत चालू ठेवल्यास संधिवातासारखे आजार होतात. ज्यावेळी आपण या वातानुकुलित यंत्राखाली असतो, त्यावेळी आपल्या शरीराला घाम येत नाही. त्यमुळे शरीरातील टाकाऊ द्रव्ये बाहेर निघत नाहीत. मग दीर्घकाळापर्यंत अनेक आजारांचा धोका असतो. उदा. त्वचेची ॲलर्जी किंवा खाज सुटणे, उच्च रक्तदाब, इ.जेव्हा आपण अशा कमी तापमानात यंत्र चालविता, तेव्हा हे यंत्र पंचतारांकित असले तरीसुद्धा ‘कॉम्प्रेसर’ पूर्ण उर्जेवर कार्य करतो. यासाठी अत्याधिक उर्जा वापरली जाते, ती आपल्या आरोग्यासह, आर्थिक नुकसानसुद्धा करते.

उत्तम मार्ग कोणता असेल, तर तापमान २६ अंश किंवा त्याहून अधिक वर निश्चित करा. यंत्र २६ अंशांवर चालविणे आणि पंखा कमी करणे नेहमीच चांगले असते. यासाठी कमी वीज खर्च होईल. आपल्या शरीराचे तापमान योग्य असेल; आणि आपल्या आरोग्यावरही परिणाम होणार नाही. निश्चितपणे जागतिक तापमानवाढीचे परिणाम कमी करण्यास मदत करेल. समजा, आपण आपले यंत्र २६ अंशांवर ठेवले, आपल्यासारख्या आणखी ५ दशलक्ष नागरिकांनीही २६ अंशावर चालविले तर आपण प्रतिदिन ५ दशलक्ष युनिट वीज वाचवू शकणार आहोत. ही काळाची गरज आहे. प्रादेशिक स्तरावर ही बचत प्रत्येक दिवशी करोडो युनिट असू शकते. कृपया या माहितीचा विचार करा. यंत्राचा पुरेपूर लाभ घ्या; परंतु २६ अंश सेल्सिअसपेक्षा कमी चालवू नका. आपले शरीर आणि वातावरण निरोगी ठेवा.

Next
शीतगृह आणि गोदाम: शेतकऱ्यांचे मित्र
March 29, 2023
Previous
ह्युंदाईची मुफासा एसयूव्ही
March 29, 2023
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to असा घ्या वातानुकूलित यंत्राचा लाभ?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !