अश्विनी होणार का मिसेस इंडिया

झी मराठीवरील ‘तू चाल पुढं’ मालिकेच्या नवीन प्रोमोत अश्विनी अंतिम फेरीत पोहोचल्याचे दिसत आहे. प्रश्नोत्तरांच्या फेरीत तिला इंग्रजीतून उत्तर देण्यासाठी सांगितले जाते. येथे चक्क शिल्पी परीक्षक आहे. ती अश्निनीला अवघड जाईल, या उद्देशानेच इंग्रजीतून उत्तर द्यायला सांगत असून अश्विनी मातृभाषेतून बोलण्याची परवानगी मागत आहे. बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर यात मुख्य परीक्षक आहे. ईशा अश्विनीला मराठीत बोलायची परवानगी देणार का, यासाठी मालिकेचे भाग पहावे लागतील.

या मालिकेत आता ‘मिसेस इंडिया २०२३’ ग्रॅन्ड फिनाले’ चा विशेष आठवडा सुरू झाला आहे. या मालिकेतील नायिका अश्विनी वाघमारे या स्पर्धेत उतरली आहे. गृहिणी असलेली अश्विनी थेट मिसेस इंडिया स्पर्धेत सहभागी झाली आहे. दरम्यान, या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मात्र केलेल्या कमेंट्स खुमासदार आहेत.

शिल्पीला या स्पर्धेत परीक्षकांच्या खुर्चीत पाहून प्रेक्षकांनी मालिकेची खिल्ली उडवली आहे. ”लेखक काय डोक्यावर पडलाय का?” असेही एका युझरने म्हटले आहे. ‘मिसेस इंडिया २०२३’ चा अंतिम सोहळा आता लवकरच पार पडणार आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *