Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

उत्सुकता बलोचची

चित्रपट निर्माते प्रकाश पवार यांच्या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक ‘बलोच’ने समाजमाध्यमांवर  दिग्दर्शित होण्यापूर्वीच धुमाकूळ घातला आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यासाठी अभिनेते प्रवीण तरडे यांचे छायाचित्र असलेले एक नवीन पोस्टर प्रदर्शित केले. पोस्टरमध्ये अभिनेते प्रवीण तरडे यांनी साकारलेल्या भारदस्त व्यक्तीमत्वाची  मिशी, बलदंड शरीर आणि डोळ्यातील आग रसिकांना भावली आहे. हा चित्रपट 5 मे 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘बलोच’चे उद्दिष्ट लढाईतील आणि आसपासच्या घडामोडींव प्रकाश टाकण्याचे आहे. या चित्रपटात भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे, तेजश्री जाधव, विशाल निकम आणि रोहित आवळे यांसारख्या कलाकारांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

प्रकाश पवार यांचा ऐतिहासिक, भावनिक, संगीत, सामाजिक, कौटुंबिक अशा भावनांना पडद्यावर साकारणारा हा चित्रपट असणार आहे. पानिपतनंतरच्या युद्धातील  मराठा साम्राज्य आणि आक्रमक अफगाण सैन्य यावर प्रकाशझोत टाकतो. त्यात नेमके काय दडले आहे, हे चित्रपटगृहात जाऊनच पाहावे लागेल

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *