Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

जांभूळ सरबत

साहित्य
२०-२५ पिकलेली काळी जांभळे,पाव वाटी साखर,अर्धा चमचा मीठ,गरजेनुसार पाणी

कृती
प्रथम जांभळे धुवून घ्यावीत.. त्यातील बिया वेगळ्या करून एका पातेल्यात गर काढून घ्यावा. या गरात एक भांडे पाणी घालून हे मिश्रण गरम करण्यास गॅसवर ठेवावे. २-३ मिनिटे उकळल्यावर साखर घालून खाली उतरवावे. मिश्रण थंड होईपर्यंत साखर आपोआप विरघळेल. थंड मिश्रणात मीठ घालून मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यावे. आता हे मिश्रण गाळून एका बाटलीत भरून  शीतकपाटामध्ये ठेवावे. सरबत बनविताना बाटलीतील मिश्रण १ भाग आणि ४ भाग थंड पाणी एकत्र करून पिण्यास द्यावे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *