
ॲमेझॉन, फ्लिपकार्ट ते क्रोमापर्यंत ‘आयफोन १२’ वर सवलतीत आयफोन उपलब्ध आहे. वेगवेगळ्या सवलतींचा फायदा ग्राहक येथे घेऊ शकतात. यासाठी ग्राहकाला ‘ॲपल आयफोन 12 ‘ ची वैशिष्ट्ये समजून घ्यावी लागतील.
आयफोनमध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले दिला आहे. छायाचित्रे आणि चलच्चित्रांसाठी या फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये फ्रंटला १२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवर आयफोन 12 वर १८ टक्के सवलत आहे. एक्सचेंज ऑफरचा फायदा घेतल्यास २८ हजार रुपयांपर्यंत बचत करता येऊ शकते. एचडीएफसी बँक, यस बँक आणि एचएसबीसी बँकेवर ऑफर्स मिळत आहे.

या आयफोनला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर ९ टक्के सवलत असून ५३ हजार ९९९ रुपये किंमतीत मिळत आहे. याशिवाय, यावर एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊ शकता. जर एक्सचेंज ऑफर मिळाल्यास तुम्हाला ३० हजार रुपयांची सवलत मिळेल. म्हणजेच सवलत आणि मॅक्सिमम एक्सचेंज बेनिफिट दोन्ही मिळून ‘आयफोन १२’ ची किंमत १० हजार रुपयांपर्यंत कमी होऊन हा फोन २३ हजार ९९९ रुपये होईल. याशिवाय, काही व्हेरियंट्सवर ३ हजार रुपयांची बँक ऑफरसुद्धा मिळत आहे.