Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

मारुती फ्रॉन्क्स लवकरच बाजारात

मारुती सुझुकीची ‘मारुती फ्रॉन्क्स’ ही नवीन कार पुढील आठवड्यात बाजारात येत आहे. ऑटो एक्सपो 2023 पासूनच या गाडीच्या  लाँचिंगची ग्राहकांना उत्सूकता आहे. ‘मारुती फ्रॉन्क्स’ ला लवकरच लाँच करण्यात येणार असून याची किंमत ८ लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. टॉप मॉडेलची किंमत ११ लाख रुपये दरम्यान असू शकते. या अंदाजित किंमती आहेत.

या ‘मारुती फ्राँक्स’ मध्ये की-लेस एंट्री, पॉवर्ड विंडो, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रिवर्स पार्किंग सेंसर, हिल होल्ड असिस्ट, डुअल-टोन इंटीरियर, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, स्टील व्हील्स, हॅलोजन, प्रोजेक्टर हेडलँप दिले जाणार आहेत. ‘मारुती फ्राँक्स’ला ५ व्हेरियंट सिग्मा, डेल्टा, डेल्टा प्लस, जीटा आणि जीटा प्लस मध्ये लाँच केले जाणार आहे. यात ३६० डिग्री कॅमेरा, हेड-अप डिस्प्ले यूनिट,७ इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट, वायरलेस अँड्रॉयड ऑटो, ॲप्पल कार प्ले, ६ स्पीकर्स, सोबत साऊंड सिस्टम आणि सुझुकी कनेक्टेड कार फीचर्स मिळतील.

या एसयूव्ही मध्ये दोन पेट्रोल इंजिन पर्याय मिळतील. यासोबत ५ स्पीड मॅन्युअलसोबत ६ स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्सचा पर्याय असेल. नवीन मारुती कारचे १.२ लीटर इंजिनचे मॉडल मॅन्युअल ट्रान्समिशन सोबत 21.79kmpl चे मायलेज देते. तर याचे ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे व्हेरियंट 22.98 किमी. पर्यंत मायलेज देऊ शकते.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *