Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

रेडमीचा अँड्रॉयड टीव्ही

मोठ्या पडद्यावर मालिका-खेळ पहावेत, असे वाटत असेल तर अर्थातच मोठा टीव्ही खरेदी करावा लागेल.  रेडमीचा ४३ इंचाचा अँड्रॉयड टीव्ही ४० टक्के सवलतीत खरेदी करण्याची नामी संधी आहे.
या टीव्हीची खरी किंमत ४२ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, ४० टक्के सवलतीत मिळत असल्याने या टीव्हीची किंमत २५ हजार ९९९ रुपये एवढी होते. ग्राहकाला ही किंमत जास्त वाटत असेल तर हा टीव्ही ईएमआयवर सुद्धा खरेदी करता येऊ शकतो. हप्त्याची रक्कम दर महिना १ हजार २४२ रुपये एवढी होते. यासोबत २५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरसुद्धा आहे. संपूर्ण एक्सचेंज ऑफर मिळाल्यास २३ हजार ४९९ रुपये किंमतीत ग्राहक हा टीव्ही खरेदी करू शकतात.

या टीव्हीत 4 के अल्ट्रा एचडी डिस्प्ले दिला असून डिस्प्ले आकार ४३ इंच आहे. रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज असून यात ड्युअल बँड वायफाय आहे. यात ब्लूटूथ, बिल्ट इन क्रोमकास्ट दिले आहे. सोबत २ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेज दिले आहे. हे यासोबत १ वर्षाची वॉरंटी दिली जात आहे.

तसेच एचडीएफसी  बँकेच्या क्रेडिट व डेबिट कार्डवरून पैसे भरल्यास  १० टक्के सवलत मिळते. एचएसबीसीच्या क्रेडिट कार्डवरून  पैसे भरल्यास   ७.५ टक्के त्वरित सवलत मिळते.  यस बँकेच्या क्रेडिट कार्डवरून  पैसे भरल्यास   ७.५ टक्के त्वरित सवलत मिळू शकते. 

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *