Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

सलमानचा किसी का भाई किसी की जान

सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट या २१ एप्रिलला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. दिग्गज कलाकारांमुळे या चित्रपटाकडे लक्ष वेधले जात आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रदर्शित होताच खळबळ उडवून दिली आहे. सलमान खानच्या या आगामी चित्रपटाचा ट्रेलर २४ तासांत यूट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसह इतर अनेक प्लॅटफॉर्मवर ५१ दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे. सलमानच्या या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: समाज माध्यमांवरील युजर्स या ट्रेलरने खूप उत्साहित दिसत आहेत. ”हा चित्रपट अप्रतिम असणार आहे”; ”हा अलीकडच्या काळातील नक्कीच सर्वोत्तम आहे, जो सलमानपेक्षा चांगला कोणीही करू शकत नाही,” अशा प्रतिक्रिया येत आहेत.

फरहाद सामजी यांनी ‘किसी का भाई किसी की जान’चे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात पहिल्यांदाच सलमान खान आणि पूजा हेगडेची जोडी दिसणार आहे. या दोघांशिवाय व्यंकटेश, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर या चित्रपटात दिसणार आहेत. ॲक्शन – फॅमिलीड्रामा आणि प्रणयाने भरलेला हा चित्रपट 2023 च्या ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. झी स्टुडिओद्वारे तो जगभरात प्रदर्शित केला जाईल.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *