Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

नेहमीची पण वेगळी प्रेमकथा सर्जा

‘सर्जा’ हा मराठी चित्रपट आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. आतापर्यंत अनेक प्रेमकथांनी रसिकांच्या मनात जागा मिळविली असली, तरीही प्रत्येक चित्रपटात काहीतरी वेगळे असतेच. ग्रामीण बाज असणाऱ्या ‘सर्जा’ चित्रपटाची कथाही वेगळी आहे. रसिकांना प्रेमातील आजवर न पाहिलेले पैलू या चित्रपटात पहायला मिळतील. प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटाच्या भित्तीचित्राने रसिकांकडून वाहवा मिळविली होती. त्यामुळे चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.

‘सर्जा’ चित्रपटाची निर्मिती अमित पाटील यांनी केली आहे. रमेश लाड या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. धनंजय खंडागळे यांनी या संगीत प्रेमकथा असणाऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखनही खंडागळे यांचेच आहे.

ग्रामीण साज असलेली ही कथा खेडेगावात घडते. ‘सर्जा’मधील मुख्य भूमिकेत मराठीतील कोणताही मोठा अभिनेता नाही, हे विशेष ! तरीही रसिकांच्या मनात या चित्रपटाने कुतूहल निर्माण केले आहे. समाजमाध्यमावर या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद दिसत आहे.’सर्जा’बाबत दिग्दर्शक धनंजय खंडागळे म्हणतात, हा एक खराखुरा वाटावा असा चित्रपट आहे. यातील प्रत्येक भूमिका आपल्याशी कुठेतरी जुळते असे वाटेल. प्रेक्षकांसमोर एक परिपूर्ण सिनेमा सादर करण्याचा प्रयत्न आमच्या संपूर्ण चमूने केला आहे.

संगीतकार हर्षित-अभिराज यांनी ‘सर्जा’साठी संगीत दिले आहे. या चित्रपटात अनिल नगरकर, रोहित चव्हाण, तुषार नागरगोजे, ऐश्वर्या भालेराव, आकाश पेटकर, ज्योती शेतसंधी, जगन्नाथ घाडगे, विष्णू केदार, प्रशांत पिसे, बालकलाकार गौरी खंडाळे, कुणाल गायकवाड आदी कलाकारांनी व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *