Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

लवकरच रंगभूमीवर सुमी आणि आम्ही

दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांचे नवीन नाटक ‘सुमी आणि आम्ही’ लवकरच रंगभूमीवर येणार असून या नाटकाद्वारे जवळपास ९ वर्षांनी ते नाटयदिग्दर्शन करणार आहेत. बेर्डे यांच्या प्रत्येक कलाकृतीतून त्यांचा व्यासंग, अभ्यास डोकावत आला आहे. या नवीन नाटकाचे संगीत तसेच नेपथ्याची जबाबदारी ते स्वतःच सांभाळणार आहेत.

‘सुमी आणि आम्ही’ या नाटकाची निर्मिती राजस प्रोडक्शन आणि मायबोली चित्र यांनी केली आहे. एप्रिलच्या अखेरपर्यंत हे नाटक रंगभूमीवर येईल. राजस गोडसे आणि शैलेश राजे नाटकाचे निर्माते आहेत. राजन मोहाडीकर यांनी हे नाटक लिहिले आहे. मोहन जोशी, सविता मालपेकर, श्रद्धा पोखरणकर, उदय लागू, राजेश चिटणीस, प्रदीप जोशी, चंद्रशेखर भागवत ही मंडळी ‘सुमी आणि आम्ही’ नाटकात भूमिका साकारणार आहेत. आपल्या मुलीचे ध्येय पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या आई वडिलांची गोष्ट यात सांगितली आहे.

‘कामाठीपुरा’ ही वेबमालिका, ‘कलापानी’ हा चित्रपट, ‘थरार..२६ जुलैचा’ हे नाटक, ‘जाऊबाई जोरात द्वितीय’ नाटक अशा विविध कलाकृती ते रसिकांच्या मनोरंजनासाठी पुढे घेऊन येणार असल्याचे समजते.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *