
पिठाच्या कोंड्यापासून बनविलेला लेप सौंदर्यवर्धक आहे. उन्हाळ्यात घाम, तसेच उष्णतेमुळे त्वचा रखरखीत होत असते. अशा वेळी रसायनयुक्त लेप वापरण्यापेक्षा घरगुती लेप स्वतःच बनवून त्वचा चमकदार करता येते.
चेहऱ्याची त्वचा उजळविण्यासाठी पिठाचा कोंडा उपयुक्त आहे. आणखी साहित्य मिसळून पिठाच्या कोंड्याचा लेप घरी बनविता येतो. यासाठी पिठाचा कोंडा एक चमचा, गुलाबपाणी एक चमचा, एक चिमूटभर हळद, कोरफडीचा द्रव एक चमचा, इ. साहित्य लागते.

प्रथम एका भांड्यात गव्हाचा कोंडा घ्यावा. आता त्यात गुलाबपाणी, हळद आणि कोरफडीचा द्रव घालावा. हे सर्व छान मिसळून लेप तयार करावा. हे मिश्रण चेहऱ्यावर हळूवार लावावे. चेहऱ्यावर १० मिनिटे तसेच राहू द्यावे. नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करावा. यामुळे चेहरा छान चमकदार होईल.