Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

केसांची समस्या

केसांची गळती ही अलीकडील फार मोठी समस्या आहे. बऱ्याचजणींना वाटते वारंवार केस धुतल्यामुळे ते गळत असावेत; मात्र हे सत्य नाही.

केस धुताना वापरला जाणारा ‘हार्ड शँपू’ किंवा खूप जोरात घासून केस धुण्यामुळे केस, तसेच डोक्यावरील त्वचेला नुकसान पोहोचू शकते; ज्यामुळे केसगळती अधिक प्रमाणात होते. याकरिता केस धुण्यासाठी सौम्य शँपू वापरणे आवश्यक आहे. केस धुताना ते जास्त जोराने घासू नयेत. कोणत्याही शँपूचे घटक डोक्यात तसेच राहू नयेत याकरिता अवशेष टाळण्यासाठी केस पूर्णपणे स्वच्छ धुणे आवश्यक आहे. म्हणजेच केस धुताना केसातील शँपू पूर्णपणे निघून जायला हवा; अन्यथा यामुळे केस जास्त प्रमाणात गळतात.

केस गळणे हा केसांच्या वाढीच्या चक्राचा एक नैसर्गिक भाग आहे, हेसुद्धा लक्षात घ्यायला हवे. केस धुताना किंवा केस विंचरताना काही प्रमाणात केस गळणे सामान्य आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नये. मात्र जास्त प्रमाणात केस जाऊन आपल्या डोक्यावरील केसांचे प्रमाण कमी होत असेल, तर ते चिंताजनक आहे. केस विंचरतानाही हलक्या हाताने वेणीफणी करावी. ते कसेही ओढू नयेत किंवा केसातील जटाही कशाही पद्धतीने सोडवू नयेत.  

केसांच्या वाढीसाठी शक्यतो घरगुती उपायांना प्राधान्य द्यावे. केसांची योग्य निगा राखावी. रसायनयुक्त पदार्थांचा वापर केसांसाठी करण्यापूर्वी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा. निसर्गातील अनेक पदार्थ केसांच्या वाढीसाठी पोषक असतात. अशा पदार्थांचा वापर केल्यास ते उशिरा परिणाम देत असले, तरी कोणताही घटक नकारात्मक परिणाम करीत नाही.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *