Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

स्वतःसह कुटुंबाची घ्या काळजी

कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचा हा नवीन प्रकार असून तो मागील प्रकारांपेक्षा जास्त गंभीर नाही. सध्या देशभरात कोरोनाचे एकूण 61,233 सक्रिय रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर कोणीही घाबरून जाऊ नये. कौटुंबिक स्तरावर प्रत्येकाने स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्यायला हवी.  

जर आपणास कणकण असेल, तर पुरेशी विश्रांती घेण्याची गरज आहे.  द्रव पदार्थांचे सेवन जास्त करावे. तापासारखे वाटत असल्यास ‘पॅरासिटामॉल’ गोळी घ्यावी. यानेही जर ताप गेला नाही, तर आपण डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेतला पाहिजे.  

जर कुटुंबातील कुणालाही खोकला असेल, तर पाठीवर किंवा पोटावर झोपण्याऐवजी  एका बाजूने  झोपावे. झोपताना एक चमचा मध प्यावा. पांढरा कांदा पातळ कापून त्यात गूळ घालून ठेवावा. दोन तासांनी हे मिश्रण खावे. यामुळे खोकला कमी होऊ शकतो.  खोकला जात नसल्यास डॉक्टरांकडे गेलेच पाहिजे.

श्वासोच्छवासाचा त्रास होत असेल, तर हळुहळु प्राणायाम करून बघा.  ताठ बसून नाकाने श्वास घ्या. गंभीर वाटत असल्यास डॉक्टरांकडे जा.  

सध्याच्या या दिवसात बाहेरचे खाणे पूर्णपणे टाळा. घरचे सकस भोजन घ्या. रोगप्रतिकारकशक्ती वाढवा. कोरोनाच्या वेळी रुग्णाची भूक मंदावते. अशा वेळी थकवा जाणवतो. म्हणून आधीच जागरूक असलेले केव्हाही चांगले !

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *