
सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी भेटीस आणलेला दहा वर्षांचा ‘बोक्या सातबंडे’ खूप लोकप्रिय झाला. आता हा नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. महाराष्ट्रात सध्या ‘बोक्या सातबंडे’ नाटकाचे पुणे, ठाणे आणि मुंबईमध्ये दणदणीत प्रयोग सुरु आहेत. पुस्तकांमध्ये वाचलेल्या बोक्या सातबंडेला पाहण्यासाठी नाट्यगृहांमध्येही गर्दी होत आहे. अनामिका थिएटर्स, भूमिका थिएटर्स आणि मिलाप थिएटर्स निर्मित या नाट्यकृतीचे लेखन डॉ. निलेश माने यांनी केले आहे. विक्रम पाटील, प्रणव जोशी यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेली आहे.

आरुष बेडेकर हा बालकलाकार असून नेपथ्य संदेश बेंद्रे, प्रकाशयोजना राहुल जोगळेकर,संगीत निनाद म्हैसळकर यांचे आहे. दिनू पेडणेकर, राहुल कर्णिक, रणजित कामत, राजन बापट, दीप्ती प्रणव जोशी हे निर्माते आहेत, तर नक्की या खट्याळ, मिश्कील बोक्या सातबंडेला लवकर भेटून या!