Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

किसी का भाई किसी की जान आज प्रदर्शित

सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तब्बल साडे तीन वर्षांनंतर सलमानने चित्रपटात पुनरागमन केले आहे.

या चित्रपटावरून समाजमाध्यमांवर चौफेर फड रंगले आहेत, एवढे नक्की ! एका चाहत्याने लिहिले आहे की, ” ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामधील सलमानचा प्रवेश जबरदस्त आहे. त्याचा एकंदर आविर्भाव, मोठे केस, त्याचे व्यक्तिमत्व आणि भूमिका या सर्व गोष्टींनी माझे मन जिंकले आहे. या चित्रपटाची दमदार सुरुवात झाली आहे.”

तर दुसऱ्या एका चाहत्याने म्हटले आहे की, “सलमानचा चित्रपटात दणदणीत प्रवेश झाला आहे.” आणखी एकाने म्हटले आहे, ”सलमान खानचा प्रवेश झाल्यानंतर सिनेमागृह ‘स्टेडियम’ सारखे वाटू लागते.” फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान याच्यासोबत पूजा हेगडे, शहनाज गिल, व्यंकटेश दग्गुबाती, सिद्धार्थ निगम, राघव जुयाल, पलक तिवारी आणि जस्सी गिल हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटासोबत आज अन्य कोणताही हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला नसल्याने या चित्रपटाला त्याचा फायदा मिळू शकतो. दुसरीकडे ईदची सुट्टी असल्याने भाईजानच्या या चित्रपटाला गर्दी जमू शकते, असे देखील म्हटले जात आहे. सलमान खानचे काही चित्रपट लागोपाठ ‘सुपरफ्लॉप’ ठरले आहेत. मागील काही वर्षात प्रदर्शित झालेले चित्रपट सातत्याने बॉक्स ऑफिसवर आपटताना दिसून आले होते. ‘ट्यूबलाईट’, ‘भारत’, ‘राधे’, ‘अंतिम’ अशा चित्रपटांकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *