Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

केरळची कोळंबी कढी

केरळ हे समुद्रकिनाऱ्यावरील निसर्गरम्य राज्य आहे. येथील खाद्यसंस्कृती अर्थातच मासे या घटकाभोवती फिरते. केरळमधील असाच एक लोकप्रिय पदार्थ !

साहित्य : 200 ग्रॅम कोळंबी, अर्धा लहान चमचा हळद पावडर, दीड लहान चमचा मिरची पावडर, 2 मोठे चमचे स्वयंपाकाचे तेल, मूठभर कढीपत्ता, 2 सुक्या लाल मिरच्या, एक चमचा मोहरी, अर्धा कप चिरलेला कांदा, अर्धा कप चिरलेला टोमॅटो, एक चमचा आले-लसूण वाटण, अर्धा लहान चमचा धणे पावडर.

कृती : कोळंबी स्वच्छ करून वाहत्या पाण्याखाली धुवा. कोळंबीला मीठ आणि हळद घालून बाजूला ठेवा. एक पॅन गरम करून घ्या. त्यात 2 चमचे तेल घाला. नंतर मोहरी, कढीपत्ता,धणे पावडर आणि लाल मिरच्या घाला. आता यात बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घाला. 3-4 मिनिटे परतून घ्या. त्याच टोमॅटो-कांद्याच्या मिश्रणात एक चमचा आले-लसूण वाटण आणि 1 चमचा लाल तिखट घाला. एकत्र करण्यासाठी चांगले मिसळून घ्या. मसाल्याचा कच्चा वास निघून गेला की, एक कप पाणी घालून एक उकळी आणा. ही केरळची प्रसिद्ध कढी भात किंवा पराठ्यांसोबत खाण्यास द्या.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *