Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

उन्हाळ्यात वापरावा पुदिना

उन्हाळा सुरू होताच अनेकांना पुदिन्याची आठवण येते. पुदिन्यामुळे शरीरास थंडावा आणि ताजेपणा जाणवतो. पुदिना सौंदर्यवर्धकही आहे. यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात. वास्तविक, पुदिन्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. यामध्ये ‘सॅलिसिलिक ॲसिड’ आणि जीवनसत्व ‘ए’ आहे. पुदिन्यातील गुणधर्म मुरुमे नाहीशी करतात. यामुळे त्वचा नैसर्गिक पद्धतीने मुलायम होण्यास मदत होते. उन्हाळ्यात त्वचा तुकतुकीत ठेवायची असेल तर त्यापासून बनविलेला लेप जरूर लावावा.

पुदिना आणि काकडीचा लेप बनविण्यासाठी पुदिन्याची ताजी पाने घ्यावीत. अर्धी काकडी घेऊन ती किसावी. त्याचा रस काढावा. आता काकडीचा रस आणि पुदिन्याची पाने बारीक करून घ्यावीत. हा लेप संपूर्ण चेहरा आणि मानेवर लावा. 20 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवावा.

पुदिना आणि तुळशीचा लेपसुद्धा गुणकारी आहे. तो उन्हाळ्यात त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करू शकतो. यासाठी पुदिना, तुळस आणि कडुलिंबाची काही पाने घ्यावीत. सर्व ग्राइंडरमध्ये बारीक करावीत. बारीक वाटण बनवून ते संपूर्ण चेहराआणि मानेवर लावावे. अर्ध्या तासानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा. उन्हाळ्यात लोक मुलतानी मातीचा लेप लावतात. हा लेप आणखी प्रभावित करण्यासाठी पुदिना आणि मुलतानी मातीचा लेप तयार करावा. यामुळे त्वचा छान तुकतुकीत होईल. त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकेल. पुदिना आणि मुलतानी मातीचा लेप बनविण्यासाठी सर्वप्रथम पुदिन्याची पाने बारीक करून घ्यावीत. त्यात 1 चमचा मुलतानी माती मिसळावी. त्यात 1 चमचा मध किंवा दही घालावे. आता हा लेप चेहऱ्यावर लावावा. 20 मिनिटांनंतर त्वचा स्वच्छ करावी. हा लेप लावल्याने त्वचा चमकदार होते. घामामुळे होणारा चिकटपणाही निघून जातो. त्वचेला थंडावाही येतो.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *