टोमॅटो सॉस
कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणाऱ्या व्यवसायाच्या शोधात अनेकजण असतात. टोमॅटो सॉस हा असाच एक व्यवसाय आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी साधारण 2 लाख रुपये गुंतवावे लागतील. भारतात चायनीज पदार्थांचा वापर वाढला आहे. त्यामुळे येथे सॉसनाही अर्थातच मोठी मागणी आहे. जवळपास प्रत्येक घरात, उपहारगृहात, हॉटेलमध्ये टोमॅटो सॉस वापरला जातो.

टोमॅटो सॉस हा समोसेपासून पिझ्झा टॉपिंग इत्यादी अनेक खाद्यपदार्थांसोबत खाल्ला जातो. टोमॅटो सॉस हा एक फायदेशीर व्यवसाय आहे. भारतात सर्वाधिक टोमॅटोची लागवड केली जाते. स्वस्त टोमॅटो येथे सहज उपलब्ध असतात. टोमॅटो सॉसचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी, आपल्याला कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हे शोधून काढावे लागेल. टोमॅटो सॉसचा व्यवसाय सुरू करण्यासाठी गुंतवणूक, जमीन, यंत्रसामग्री, नोंदणी आणि परवाना,कर्मचारी, कच्चा माल, जागा, वीज यांची आवश्यकता असते.
साखर, व्हिनेगर, मीठ, फ्लेवर यांसह कांदा, काळी मिरी, मोहरी, आले इत्यादी मसाले लागतात. या व्यवसायात हाताने चालवाव्या लागणाऱ्या, अर्ध स्वयंचलित आणि पूर्णपणे स्वयंचलित यंत्रे आहेत. तुमच्या आर्थिक नियोजनानुसार तुम्ही कोणतेही एक निवडू शकता. टोमॅटो केचप बनविण्याच्या यंत्राची किंमत सुमारे 35000 रुपयांपर्यंत जाते. ते आपण ऑनलाइन खरेदी करू शकता. हा व्यवसाय घरातील एका छोट्या खोलीतून सुरू करू शकता.

जिथून काम अधिक कार्यक्षमतेने आणि पद्धतशीरपणे करता येईल, अशी जागा निश्चित करावी. प्रथम टोमॅटो घेणे आवश्यक आहे. हे सर्व टोमॅटो पाण्याने स्वच्छ करावेत. फूड प्रोसेसरच्या मदतीने त्यांचे लहान तुकडे करून घ्यावेत. यानंतर बारीक चिरलेले कांदे कमी तेलात तळून घ्यावेत. यानंतर, काळी मिरी, मोहरी इत्यादी मसाले एकाच वेळी घालावे लागतात. यानंतर टोमॅटो काही वेळ मंद आचेवर गॅसवर ठेवावेत. यावेळी, आपल्याला त्यात व्हिनेगर, स्वीटनर, चवीनुसार मीठ आणि आवश्यक फ्लेवर्स घालावे लागतील. यानंतर, ते शिजवण्यासाठी 20 मिनिटे मंद आचेवर ठेवले पाहिजेत. 20 मिनिटांनंतर तुमचा सॉस वेष्टनबंद करण्यासाठी तयार आहे.
या व्यवसायात शासनाकडून मदत मिळत असल्याने या व्यवसायासाठी परवाना आवश्यक आहे. तुमच्या उद्योगाची नोंदणी फक्त सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालय येथे करणे योग्य आहे. सर्वप्रथम टोमॅटो सॉस विकण्यासाठी प्रसिद्धी करावी. त्यामुळे ओळख निर्माण होईल. यासाठी तुम्ही ठिकठिकाणी पोस्टर्स, बॅनर लावू शकता. वृत्तपत्रातील लोकांना जाहिरात देऊ शकता. तुम्ही विविध समाज माध्यमांवर जाहिरातीदेखील देऊ शकता. हॉटेल-रेस्टॉरंट, किराणा दुकान, टोमॅटो सॉस शॉपच्या मालकांशी संपर्क साधावा.