Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

साध्या उपायांनी पळवा डाग

शरीरावर जखमा होणे, यात विशेष काही नाही ! कधी खेळताना, काम करताना किंवा एखाद्या अपघातात अंगावर जखमा होतात. या जखमा भरुन येण्यास ठराविक वेळ जातो. कधीकधी जखम बरी झाली, तरी त्याचा डाग मात्र तसाच राहतो. हा डाग दिसण्यासारखा असला, तर नैराश्य येते. हे डाग घालविण्यासाठी काही घरगुती सोपे उपाय करुन पहावेत.

मेथीचे दाणे रात्रभर भिजवावेत. सकाळी त्याचे वाटण करून लेप बनवावा. हा लेप जखमेवर लावावा. लेप पूर्ण सुकल्यावर थंड पाण्याने स्वच्छ धुवावा. मेथीप्रमाणेच हळदीचा लेप बनवून लावल्यास जखम लवकर भरण्यास तसेच व्रण दूर होण्यास मदत होते. बटाट्याची साल काढून ती जखमेवर लावावी; मात्र ही साले स्वच्छ धुवून घ्यावीत.

लिंबू आणि टोमॅटो घरात सहज उपलब्ध असतात. जखम थोडीशी बरी झाल्यानंतर हा उपाय करावा. साध्या पाण्याने जखमेचा भाग स्वच्छ धुवून घ्यावा. त्यावर ओला आणि स्वच्छ कपडा ठेवा. काही तासाने ताज्या लिंबाच्या रसात बुडवलेले कापड या जखमेवर ठेवा. त्वचा सुकल्यानंतर त्यावर टोमॅटोचा रस लावावा, असे दिवसातून दोन वेळा केल्यास जखमेचा डाग कमी होण्यास मदत होईल.

बदामाचे तेल जखमेवर लावल्यावर त्यापासून लवकर आराम मिळेल. दिवसातून दोनवेळा हे तेल जखमेवर लावून हलका मसाज करावा.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *