गाडी धुण्याचा व्यवसाय
चारचाकी वाहन ही आजची गरज बनली आहे. गाडी विकत घेतल्यावर ती नेहमीच चमकत राहिली पाहिजे, असे प्रत्येकाला वाटत असते. लोक कठोर परिश्रम घेऊन गाडी खरेदी करतात, त्यामुळे ती स्वच्छ ठेवण्याकडे त्याचा कल असतो. गाडी अधिक काळ चांगली राहण्यासाठी ती वेळोवेळी चांगली धुणे आवश्यक असते. अर्थातच, यामुळे गाडी धुण्याचा व्यवसाय काळाची गरज बनली आहे.

भारतातील लोकांचे उत्पन्न वाढत आहे. त्यामुळे नागरिकही वाहनांची खरेदी करत आहेत. गाडी धुण्याच्या व्यवसायाबद्दल बोलायचे झाले, तर हा रु. 25,000 मध्ये हा सुरू करता येणारा व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी कोणत्याही व्यावसायिक अभ्यासक्रमाची गरज नाही. याशिवाय, फारशी उपकरणेही खरेदी करावी लागत नाहीत. कार धुण्याचा व्यवसाय अगदी कमी उपकरणांमध्ये सुरू करता येतो. स्वत:हून गाडी धुण्यासाठी कोणाकडे वेळ नसतो.
गाडी धुण्याच्या व्यवसायासाठी 10 ते 15 हजार रुपयांमध्ये ‘कार वॉशिंग मशीन’ खरेदी करावे लागेल. या यंत्राची क्षमता साधारणपणे सुमारे 2 अश्वशक्ती आवश्यक आहे. यानंतर 30 लिटरपर्यंत क्षमतेचा ‘व्हॅक्यूम क्लिनर’ घ्यावा लागेल. गाडीच्या साफसफाईसाठी शॅम्पू, पॉलिश आणि हातमोजे इत्यादी विकत घ्यावे लागतील.

गाडी उभी करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, अशी जागा आपणास निवडावी लागेल. गाडी धुण्यामधून मिळणारी कमाई वेगवेगळ्या शहरांच्या दरावर अवलंबून असते. दिल्ली, मुंबई , पुणे, नाशिक आणि आसपासच्या भागात गाडी धुण्यासाठी जास्त दर घेतात. ग्रामीण भागात तुलनेने कमी असतात. दररोज 3 ते 4 वाहने धुतल्यावर तुम्ही महिन्याला सुमारे 50,000 रुपये कमवू शकता. यामुळे हा व्यवसाय अलीकडे ग्रामीण, शहरी भागात उत्तम सुरु असलेला दिसून येतो.