स्टील उद्योग
घरोघरी स्टीलचा वापर वाढू लागल्याने स्टील उद्योगाला चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे हा उद्योग आता व्यापक रुप धारण करत आहे. स्टील उद्योगात प्रामुख्याने नट आणि बोल्ट उत्पादन, लोह आणि पोलाद आयात-निर्यात, लोह पुनर्वापर, पेपर क्लिप बनवणे, मिश्रधातू स्टील प्लांट, स्टील फर्निचर व्यवसाय, वेल्डिंग युनिट, टीएमटी बार उत्पादन, स्टील फॅब्रिकेशन, स्टेनलेस स्टीलची भांडी निर्मिती अशा विविध उद्योगांचा समावेश होतो.

हा उद्योग सुरू करण्याची पहिली पायरी म्हणजे योजना तयार करणे होय. ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो. सर्वात आधी आपल्याला वरील प्रकारापैकी व्यवसायाचा प्रकार निश्चित करावा लागेल. बाजार सर्वेक्षण करून फर्मचे नाव, ध्येय आणि दृष्टी निश्चित करावे लागेल. प्रारंभिक गुंतवणुकीचा अंदाज, गरजांची यादी (उदा. मनुष्यबळ, यंत्रसामग्री इ.), उद्योगासाठी जागा, संभाव्य प्रतिस्पर्धी, धोरणे आणि ध्येये निश्चित करावी लागतील.
यानंतर तुमच्या कंपनीची नोंदणी करायला हवी. यासाठी जलद आणि सुलभ अशा ऑनलाइन कंपनी नोंदणीचा लाभ घेणे कधीही चांगले. त्यानंतर तुमच्या कंपनीची नोंदणी करताना प्रथम फॉर्म भरावा लागतो. रक्कम भरावी लागते. दस्तऐवज मेल करावे लागतात. त्यानंतर ‘निगमन प्रमाणपत्र’ प्राप्त करावे लागते. कंपनीची नोंदणी सर्व संभाव्य कायदेशीर विवादांपासून तुमचे संरक्षण करते. शिवाय, ती मालकाचे दायित्व मर्यादित करून कर्ज मिळवून देण्याची क्षमता वाढवते.
आपण व्यवसायाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नोंदणी, मर्यादित दायित्व कंपनी, भागीदारी किंवा एकल व्यक्तीची कंपनी यापैकी कोणत्याही संरचनेत नोंदणी करू शकता.

उद्योगासाठी स्थान निवडण्यापूर्वी खालील गोष्टींचा विचार करा. पुरवठादार आणि विक्रेते हे वितरणाच्या जवळ असल्यास वाहतूक खर्च कमी करण्यास मदत होईल. ग्राहकही जवळ असणे गरजेचे आहे. काही राज्ये त्यांच्या क्षेत्रात नवीन रोजगार आणण्यासाठी प्रोत्साहन देखील देतात. उदाहरणार्थ, स्वस्त वीज आणि सहायक कंपन्या याबाबत माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा. तथापि, निर्णय हा तुमच्या व्यवसायाच्या स्वरूपावर आणि आकारावर अवलंबून असतो. कायदेशीर जबाबदाऱ्या पूर्ण केल्याशिवाय व्यवसाय टिकू शकत नाही.
कोणत्याही विरोधाशिवाय तुमचा व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व परवाने मिळवा. यामध्ये जीएसटी नोंदणी, दुकान आणि स्थापना परवाना, आयात-निर्यात कोड (स्टील आयात-निर्यात व्यवसायासाठी), उद्यम आधार, प्रदूषण प्रमाणपत्र असे हे परवाने आपणापाशी असायला हवेत.
यंत्रसामग्री खरेदी करावी लागेल. स्टील व्यवसायासाठी लागणारी साधने आणि यंत्रसामग्रीची किंमत खूपच महाग आहे.
खर्चामध्ये मशीन दुरुस्ती किंवा सेवादरही समाविष्ट केले पाहिजेत. कोणीही एकटा व्यवसाय करू शकत नाही. व्यवसायासाठी शिस्तबद्ध आणि लवचिक असलेल्या कुशल कामगारांची आवश्यकता असेल. या व्यवसायासाठी भौतिकशास्त्र, धातूशास्त्र, रसायनशास्त्र, अभियांत्रिकी, गणित, आयटी, संगणक विज्ञान, व्यवसाय व्यवस्थापन आणि लेखा विभागातील लोक आवश्यक आहेत, हे लक्षात घ्यावे.
उत्पादन आणि बांधकाम, अभियांत्रिकी, विकास प्रक्रिया, तंत्रज्ञान, संशोधन आणि विकास, टिकाव, विपणन, उत्पादन विकास, रसद अशा भागांमध्ये कामगार आवश्यक असतील.
या कारखान्याला यंत्र खरेदी करण्यासाठी आणि उद्योग उभारण्यासाठी पुरेसा निधी आवश्यक आहे. गुंतवणुकीची सुरुवात लाखांपासून कोटींपर्यंत होऊ शकते.
पोलाद उत्पादक देशांच्या जागतिक यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्टील उद्योगाचे जीडीपीमध्ये सर्वाधिक आर्थिक योगदान आहे. या उद्योगासाठी मोठी गुंतवणूक करावी लागेल, एवढे मात्र नक्की !