Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

दमदार गेमिंग फीचर्स असणारा लॅपटॉप

अनेकांना ऑनलाईन खेळण्याची प्रचंड आवड असते. हे खेळ काही फक्त लहान मुलेच खेळतात असे नाही, मोठ्यांनाही याची भुरळ पडलेली असते. कितीतरी जण या माध्यमातून पैसेही कमावतात. असे खेळ खेळण्यासाठी उत्तम फीचर्स असणाऱ्या लॅपटॉपच्या शोधात काहीजण असतात. अनेक दमदार गेमिंग फीचर्स असणारा लॅपटॉप बाजारात आला आहे, ‘ॲसर निट्रो 5’ !

ॲसर कंपनीचा जबरदस्त लूक असणारा लॅपटॉप आहे. हा लॅपटॉप एन्व्हीडीया आरटीएक्स 3050 जीपीयुसह येतो. या लॅपटॉपमध्ये 15.6 इंच फुल एचडी डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश रेट 144 हर्ट्झ आहे. हा लॅपटॉप विंडोज 11 होमसह येतो. या डिव्हाइसच्या स्टोरेजमध्ये 512 जीबी स्टोरेजचा पर्याय मिळतो. लॅपटॉपची रॅम 8 जीबी आहे, जी 32 जीबी पर्यंत अपग्रेड देखील केली जाऊ शकते. याशिवाय युजर्स एन्व्हीडीया आरटीएक्स 3050 सह मॉडेलदेखील खरेदी करू शकतात. या प्रकारात उत्तम कूलिंग आणि बॅकलिट आरजीबी कीबोर्डसह क्वाड एक्झॉस्ट डिझाइन आहे. हा लॅपटॉप ॲमेझॉनवरून रु.79,999 मध्ये खरेदी करता येईल.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *