
कोकणातील कोंडविल समुद्रकिनारा आकर्षक आहे. रत्नागिरीतील हा किनारा श्रीवर्धनपासून 5 किमी अंतरावर आहे. हा किनारा वाळूत चालण्यासाठी, स्नान करण्यासाठी, एकांतात बसून सागराची गाज ऐकण्यासाठी उत्तम आहेच, त्याहीपेक्षा येथे उपलब्ध असलेल्या जलक्रीडा साहसी क्रियाकलापांसाठी हा विशेष प्रसिद्ध आहेत. या जलक्रीडांमध्ये ‘सर्फिंग’, ‘पॅराग्लायडिंग ऑन सर्फ’ आणि ‘मोटरबोट राइड’ यांचा समावेश आहे. त्यामुळे तरुण मुलांची पावले आपोआपच या किनाऱ्याकडे वळतात.
श्रीवर्धनपासून जवळपास 4 ते 5 किमी अंतरावर असलेला हा किनारा साहसी जलक्रीडा शौकीनांची स्वप्ने साकार करण्यासाठीच आहे. येथे असलेला लांब मऊ पांढरा वाळूचा समुद्रकिनारा साहसी खेळांसाठी उत्कृष्टपणे तयार करण्यात आला आहे. या जलक्रीडा प्रकारांमध्ये 100 मैल प्रति तास वेगाने लाटा कापणारे क्रीडाप्रकार अचंबित करणारे आहेत.

श्रीवर्धनच्या कड्यावरून खाली या कोंडविल किनाऱ्यावर जाता येते. येथे गेलेल्या पर्यटकांच्या मनातून कधीही हा किनारा जात नाही, एवढे अप्रतिम सौंदर्य या किनाऱ्याने जोपासले आहे.